Bigg Boss Marathi 4 finale winner apurva nemlekar kiran mane akshay kelkar rakhi sawant amruta dhongade  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: सगळे अंदाज गेले चुलीत! ऐनवेळी असा बदलणार गेम..

बिग बॉस मराठीत असा होणार ऐनवेळी बदल..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 finale : ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत तो क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज रविवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या खेळात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहींनी अनेक अंदाज बांधले आहे. पण हे सगळे अंदाज खोटे ठरणार आहेत. कारण ऐनवेळी चित्र बदलेल अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. (Bigg Boss Marathi 4 finale winner apurva nemlekar kiran mane akshay kelkar rakhi sawant amruta dhongade )

गेली 99 दिवस आपण बिग बॉस मराठीचा खेळ पाहत आहोत, आज या खेळाचा 100 वा दिवस. अवघ्या काही तासात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. त्या क्षणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे. सध्या विजेते कोण यावर बरीच चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर पाणी पडणार आहे.

अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने हे नाव विजेत्यांच्या यादीत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अपूर्वा नावाची लाट आहे तर ग्रामीण भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात, साताऱ्यात किरण मानेचे नाव विजेत्यांच्या यादीत आहे. यामध्ये अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर ही नावं कुठेच दिसत नाहीयत. अगदी बिग बॉसच्या माजी सदस्यांनी ही अपूर्वा आणि किरण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केली आहे. पण आता ऐनवेळी डाव बदलेल असं दिसत आहे.

या खेळामध्ये सर्वात चतुर खेळाडू होता तो म्हणजे अक्षय केळकर. अक्षय अत्यंत शिताफीने हा डाव खेळला. अगदी कुठेही आरडाओरड न करता, कुठे भांडण करता तो उत्तम पद्धतीने खेळला. सुरवातीला तो अग्रेसिव्ह होता, पण नंतर शांत माणसं या खेळात जिंकतात म्हणून त्यांने आपली खेळी बदलली. त्याचे अपूर्वाशीही भांडण झाले. पण त्याने सगळ्या सदस्यांशी जवळचे संबंध जोपासले आहेत. शिवाय टास्क मध्येही तो दमदार होता. त्यामुळे ऐनवेळी निकाल बदलण्याचेही चान्सेस आहेत. तेव्हा आज काय होतंय ही पाहण्यासारखं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: गॅस एजन्सीचे बुकिंग अधिकार बंद; काळाबाजार रोखण्यासाठी आता कंपनी पोर्टलवरच नोंदणी

SCROLL FOR NEXT