Surekha Kudchi  Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 3: सुरेखा कुडची घराबाहेर; स्नेहा वाघ-जय दुधाणेला अश्रू अनावर

“बिग बॉसच्या घरात माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. पण..."

स्वाती वेमूल

“बिग बॉसच्या घरात माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. पण..."

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी सिझन ३च्या चावडीवर बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय स्पर्धकांनी हजेरी लावली. शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांनी घरातल्या स्पर्धकांची कानउघडणी केली. या भागात प्रेक्षकांना जय आणि आदिशचा रोमँटिक डान्स बघायला मिळाला. तर, सदस्यांनी एकमेकांबद्दल असलेल्या तक्रारी सांगितल्या. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य आहे. गेल्या आठवड्यात सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. या आठ जणांमधून स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

सुरेखा कुडची घराबाहेर जाणार असल्याचं कळताच तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले. घरातून बाहेर पडल्यावर सुरेखा कुडची म्हणाल्या, “या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितीमुळे ते तसं वागतात. पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमिनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. बिग बॉसच्या घरात एक वेगळीच जादू आहे हे मी मान्य करते.” महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला. त्यानुसार त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवलं.

बिग बॉसच्या घरामधून सुरेखा कुडची बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होईल, प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: खुनी सुधारू शकतो, पण सायबर गुन्हेगारांना जामीन नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, देशभरात खळबळ

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT