Bigg Boss OTT 2 Grand Finale: Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 च्या ग्रँड फिनालेची घटिका समीप आली! ती सुटकेस,रक्कम अन् ट्रॉफी सगळं जाणुन घ्या एका क्लिकवर

'BB OTT 2' ला टॉप 6 स्पर्धक मिळाले आहेत. ज्यात जिया शंकर, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, एल्विश यादव, मनीषा राणी आणि बाबिका धुर्वे हे आहेत.

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Grand Finale: गेल्या काही महिन्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वात वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असलेला बिग बॉस OTT चा दुसरा सिझन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसात घरात अनेक वाद विवाद आणि मैत्रींचे नाते प्रेक्षकांनी पाहिले.

कालच्या एलिमिनेशमध्ये अविनाश सचदेव आणि जैद हादिद यांचा पत्ता कट झाला. कमी मतदान मिळाल्याने त्यांना घरातुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता घरातले दोन स्पर्धक बाहेर गेल्याने या सिझनचे 'BB OTT 2' ला टॉप 6 स्पर्धक मिळाले आहेत. ज्यात जिया शंकर, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, एल्विश यादव, मनीषा राणी आणि बाबिका धुर्वे हे आहेत.

यंदाचा विकेंड का वार खुपच रंजक ठरला. काल रात्रीच शोमध्ये विनरची ट्रॉफी दाखवण्यात आली. बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी खूपच आकर्षक होती.

बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ देखील आता जाहिर झाली आहे. शनिवारच्या वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये, सलमान खानने शेवटी सांगितलं की बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

हा फिनाले रात्री 9 वाजता Jio सिनेमावर प्रसारित होईल. तर ऑनलाइन हा एपिसोड पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. इतकच नाही तर यंदाचा फिनाले हा पहिल्यांदाच रविवारी नाही तर सोमवारी होत आहे.

फिनालेच्या दिवशी घरात अनेक रंजक गोष्टी घडत असतात. त्यातच फिनालेला काही वेळ शिल्लक असतांना घरात पैशांनी भरलेली सुटकेस उरलेल्या सदस्यांना ऑफर केली जाते. या सुटकेसमध्ये 10 लाख असतात जे घेऊन एक स्पर्धक घराबाहेर पडतो. आता फिनालेमध्ये कोण ही पैशाने भरलेली बॅग कोण उचलणार हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

तर यावर्षी शोच्या विनरला किती रक्कम मिळणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र मागच्या एपिसोडमध्ये, अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी शोच्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना म्हणाले होते की यावेळी बिग बॉसच्या विजेत्याला 25 रुपयांचं बक्षीस रक्कम म्हणुन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT