bigg boss ott 2 jiya shankar eviction top 5 contestant bb ott 2 grand finale date winning amount and other details SAKAL
मनोरंजन

Jiya Shankar: 'वेड' मधल्या जिया शंकरचा Bigg Boss OTT 2 मधला प्रवास संपला; बिग बॉसला मिळाले टॉप 5 स्पर्धक

'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरला बुधवारी फिनालेच्या काही दिवस आधी Mid Week Eviction ला सामोरं जावं लागलं

Devendra Jadhav

Bigg Boss OTT 2 Jiya Shankar Eviction News: बिग बॉस OTT 2 मधील स्पर्धक आणि 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरला बुधवारी फिनालेच्या काही दिवस आधी कमी मते मिळाल्याने बाहेर काढण्यात आले.

आठवड्याच्या सुरुवातीला एका टास्कनंतर तिला मनीषा राणी आणि एल्विश यादव यांच्यासोबत आठवड्याच्या Mid Week मध्ये बाहेर काढण्यासाठी नॉमीनेट करण्यात आले. पण कमी मतं मिळाल्याने जियाचा Bigg Boss OTT 2 मधला प्रवास संपलाय.

बिग बॉसला मिळाले फिनालेसाठी TOP 5 स्पर्धक

वेड सिनेमातुन महाराष्ट्राच्या मनामनात पोहोचलेली जिया शंकर Bigg Boss OTT 2 मध्ये सुरुवातीपासुन चर्चेत होती. जियाचे घरात अनेकांसोबत वादविवादही झाले. आता जियाला घराबाहेर जावं लागलंय.

जिया घराबाहेर गेल्याने मनीषा, एल्विश, पूजा भट्ट, अभिषेक मल्हान आणि बेबीका धुर्वे यांनी आता Bigg Boss OTT 2 च्या फिनालेमध्ये प्रवेश केला आहे.

बिग बॉसची आकर्षक ट्रॉफी

यंदाचा विकेंड का वार खुपच रंजक ठरला. शोमध्ये विनरची ट्रॉफी दाखवण्यात आली. बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी खूपच आकर्षक होती.

बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ देखील आता जाहिर झाली आहे. शनिवारच्या वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये, सलमान खानने शेवटी सांगितलं की बिग बॉस ओटीटी 2 ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

हा फिनाले रात्री 9 वाजता Jio सिनेमावर प्रसारित होईल. तर ऑनलाइन हा एपिसोड पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. इतकच नाही तर यंदाचा फिनाले हा पहिल्यांदाच रविवारी नाही तर सोमवारी होत आहे.

सुटकेसमधले १० लाख रुपये घेऊन कोण बाहेर पडणार?

Bigg Boss OTT 2 मध्ये फिनाले जसजसा जवळ येतोय, तसं घरात अनेक रंजक गोष्टी घडत असतात. त्यातच फिनालेला काही वेळ शिल्लक असतांना घरात पैशांनी भरलेली सुटकेस उरलेल्या सदस्यांना ऑफर केली जाते. या सुटकेसमध्ये 10 लाख असतात जे घेऊन एक स्पर्धक घराबाहेर पडतो. आता फिनालेमध्ये कोण ही पैशाने भरलेली बॅग कोण उचलणार हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT