Bigg Boss Ott 2 Weekend Ka Vaar Esakal
मनोरंजन

Bigg Boss Ott 2 Weekend Ka Vaar: किसिंग प्रकरणानंतर सलमान सोडणार बिग बॉस? स्पर्धकांची भरवली शाळा...

Vaishali Patil

Bigg Boss Ott 2 Weekend Ka Vaar: सलमान खानच्या शो बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन हा या आठवड्यात खुपच चर्चेत आला, त्याचे कारण ठरले ते जैद हादीद आणि आकांक्षाचा तो किसिंग सीन...गेल्या अनेक दिवसापासून सोशल मिडियावर या प्रकरणामुळे या शो ला आणि सलमान खानला देखील ट्रोल करण्यात येत होते.

यावेळी सलमान शो होस्ट करत असल्यामुळे त्याने शो च्या सुरवातीला सांगितले होते की, कोणत्याही प्रकारचा असभ्य किंवा हलगर्जीपणा तो शोमध्ये खपवून घेणार नाही मात्र त्यातच आता या किसिंग सीन मुळे घराचं वातावरण तापलं आणि आता सलमानने यावर विकेंड का वार मध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या शोमध्ये पूजा भट्ट, जिया शंकर, अभिषेक मल्हान, बाबिका ध्रुवे, अविनाश सचदेव, मनीषा राणी, जैद हदीद, आकांक्षा पुरी, सायरस हे स्पर्धक आहेत. आता त्यातच घरात छोट्या अब्दु रोजिकने एन्ट्री केली.

सलमान खानने पुन्हा एकदा 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांचा क्लास घेतला.

सलमान खानने जैदला चांगलेच फटकारल 'अबू धाबीमध्ये जीसीसी बेल्टमध्ये असं काही करुन पहा जर सौदी अरेबियामध्ये त्याने असं केल असतं तर त्याला तुरुंगात टाकले असते, असेही सलमान म्हणाला. त्यावर जैद म्हणाला, "सर, चूक झाली. मला ती मान्य आहे."

यानंतर जैदने याबाबत सर्वांची माफी मागितली. मात्र यावर सलमान गप्प बसला नाही, तो म्हणाला की तुम्हाला अशा गोष्टी करायच्या असतील तर दुसरा शो शोधा. असला टाक्स दिल्याबद्दल सलमाने बेबिका आणि अविनाशलाही चांगलचं झापलं.

या सगळ्या प्रकारानंतर मी शो सोडत असल्याचं सलमान खानने स्पष्टपणे सांगितलं. सलमान खाननेही प्रेक्षकांची माफी मागितली आणि यावेळी जे घडले ते भविष्यात होणार नाही असे सांगितले.

या आठवड्यात, आकांक्षा पुरी ही घरातुन बाहेर पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ती तिसरी मुलगी असेल जी शोमधून जाईल. याआधी मिड वीक इव्हिक्शनमध्ये आलियाला तर पहिल्या आठवड्यात पलकला बाहेर काढण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT