shamita shetty 
मनोरंजन

Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीचीच चर्चा; स्पर्धकांशी ओढून घेतला वाद

अक्षरा आणि शमिता यांच्यात जोरदार भांडण

स्वाती वेमूल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची Shilpa Shetty बहीण शमिता शेट्टीने Shamita Shetty 'बिग बॉस ओटीटी' Bigg Boss OTT या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. शिल्पाचा पती व व्यावसायिक राज कुंद्रा Raj Kundra अटकेत असताना शमिताच्या बिग बॉसमधील सहभागाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून शमिता सर्वाधिक चर्चेत आहे. या आठवड्यात शमिताचा सहस्पर्धकांशी वाद झाला आहे. शमिता आणि दिव्या अगरवाल यांच्याकडे स्वयंपाकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र शमिताच्या डाएटवरून हा वाद सुरू झाला. अक्षरा आणि शमिता यांच्यात यावेळी जोरदार बाचाबाची झाली.

स्वयंपाकासाठी काही सामान बिग बॉसकडून पाठवण्यात आले होते. त्यापैकी काही वस्तू शमिता आणि नेहा भसिनच्या डाएटला अनुसरून पाठवण्यात आल्या होत्या. आरोग्याविषयीच्या समस्यांमध्ये इतरांपेक्षा वेगळे खाद्यपदार्थ लागणार असल्याचं शमिताने घरातील इतर स्पर्धकांना सांगून ठेवलं होतं. मात्र अक्षराला ही बाब खटकली. बिग बॉसच्या घरात मोठी सेलिब्रिटी असल्याचा आव आणणं बंद कर, अशा शब्दात अक्षराने शमिताला सुनावलं. यावरून दोघींमध्ये भांडणाला सुरुवात झाली. याआधी शमिताने बिग बॉसमधील स्पर्धक निशांत भट्टवरही आरोप केले होते. निशांतने मर्यादा सोडून वागण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा शमिताने केला.

बिग बॉसमध्ये सहभागी होण्यामागचं कारण

बिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक म्हणून एन्ट्री करताना शमिता म्हणाली, "वेळ चांगली असो किंवा वाईट, आपण श्वास घेणं तर सोडत नाही. तसंच आपण कामसुद्ध करत राहिलं पहिजे. बिग बॉस शोची ऑफर मला खूप आधी आली होती आणि मी त्यांना कमिटमेंट दिली होती. मी एकदा कमिटमेंट दिली की मागचापुढचा विचार करत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT