Bipasha Basu-Karan Singh Grover Kapil Sharma Show
मनोरंजन

करणचा दोनदा घटस्फोट, बिपाशाने कसं पटवलं घरच्यांना ?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड स्टार बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे बी टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ही जोडी त्यांच्या केमिस्ट्री आणि बाँडिंगमुळे सर्वाधिक चर्चेत असते. बिपाशासोबत लग्नाआधी करणचा दोनदा घटस्फोट झाला होता, अशा परिस्थितीत करण बिपाशाशी लग्न करू शकेल हे समाज आणि कुटुंबाला पटवून देणं अभिनेत्रीसाठी थोडं कठीण होतं.

करण-बिपाशाचे लग्न चाहत्यांसाठी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. बिपाशा बासूने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या पालकांनी करणसोबतच्या लग्नाला आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतरही करण आणि बिपाशाने २०१६ साली लग्न केले. नुकतेच बिपाशा बासूने स्वतः खुलासा केला आहे की तिने आपल्या पालकांच्या आक्षेपांना न जुमानता या लग्नासाठी कसे पटवले. बिपाशाच्या आधी करण सिंह ग्रोवरने श्रद्धा निगम (Shraddha Nigam) आणि जेनिफर विंगेट (Jennifer Winget) यांच्यासोबत लग्न केले होते, पण करणचे या दोघींसोबत पटले नाही; पण आता करण आणि बिपाशा हॅप्पी मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहेत.

बिपाशाने करणसोबत लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आक्षेप आणि ते कसे मान्य केले याबद्दल खुलासा केला. बिपाशा म्हणाली, “एखाद्याचे लग्न तुटल्याने ती व्यक्ती चुकीची असल्याचे सिद्ध होत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे लग्न मोडले तर आपण त्या व्यक्तीवर टीका करू नये. करणच्या तुटलेल्या लग्नांपेक्षा पेक्षा माझे दुसऱ्याशी असलेले नाते जास्त लांब असल्याचे मी माझ्या पालकांना समजावून सांगितले. मी माझ्या नात्यात फक्त कागदावर सही केली नाही. मग मी करणपासून वेगळा कसं होऊ शकते."

यादरम्यान बिपाशाने हे देखील सांगितले की काहीवेळा नातेसंबंध संपल्यावर हृदय कसे तुटते, परंतु कालांतराने परिस्थिती सुधारते. बिपाशा म्हणाली, “नाते चालत नाहीत, हे दुर्दैवी आहे पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्ही नेहमी आनंदी असता. तुमच्या आयुष्यात गोष्टी कारणास्तव घडतात असे नेहमी म्हटले जाते आणि ते नेहमीच खरे असते.'' 2019 मध्ये दिलेल्या मुलाखतीत करणने सांगितले होते की तो सर्व बाबतीत बिपाशाचा सल्ला घेतो. तो म्हणाला होता, ''व्यक्तिशः मी प्रत्येक गोष्टीत तिचे मार्गदर्शन घेतो. ती मला बेस्ट सल्ला देते. तिला सर्व काही सांगणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे कारण ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.''

वर्क फ्रंटवर, करण शेवटचा ZEE5 वेब सीरिज 'कुबूल है 2.0' (Qubool hain 2.0) मध्ये दिसला होता. बिपाशाचा शेवटचा प्रोजेक्ट डेंजरस ऑफ 2020 होता. करण आणि बिपाशा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT