Aamir Khan Photo Viral Esakal
मनोरंजन

Aamir Khan Viral Photo : 'तुझा ढोंगीपणा बंद कर', आमिरला नेटकऱ्यांनी झापलं..

सकाळ डिजिटल टीम

अमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याचं वागणं नेटकऱ्यांना पटत नाही. सध्या आमिर आणि त्याची एक्स वाईफ किरण रावसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आमिरला पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आमिरच्या या फोटोंमध्ये तो त्याची कंपनी आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये पूजा करताना दिसत आहे.

गुरुवारी, स्टारच्या नवीन कार्यालयात आयोजित पूजेदरम्यान आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसले. उत्सवात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी या हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लाल सिंग चड्ढा आणि पीके यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील त्यांच्या नास्तिक भूमिकेनंतर आणि त्याच्या या व्हायरल फोटोशी नेटिझन्सने तुलना केल्यामुळे आरती करत असलेल्या आमिरला ट्रोलिंगचा सामना करवा लागत आहे.

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

Aamir Khan trolled

आमिरने विधी दरम्यान कलश धारण करताना नेहरू कॅपसह स्वेटशर्ट आणि डेनिम परिधान केले होते. एकीकडे तो देव आणि धर्म याबद्दल त्याचे विचारांमूळे मध्यंतरी त्याच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. # बॉयकॉट हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला. त्याचे पडसादही त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसला. त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट चांगलाच आपटला.

हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असं अनेकांचं मत होतं. त्यामूळे आता ह्या व्हायरल फोटोंमध्ये तो पुजा करत आहे. हिंदू पंरपरांनुसार पुजा केल्याने तो केवळ ढोंग करतोय असं नेटकऱ्यांच म्हणंन आहे. या फोटोंवरुन नेटिझन्सनी त्यांची खरडपट्टी काढली आहे. चित्रपट चालावा यासाठी तो केवळं ढोंगीपणा करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हंटलयं. थोडे दिवस ढोंग केल्यानंतर तो लगेच त्याच्या चित्रपटांची घोषणा करेलं असंही नेटकरी बोलतायं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

VIDEO : अरे जरा तरी लाज बाळगा! चालत्या बाईकवर कपलचा धक्कादायक रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचे अश्लील चाळे

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Gokul Dudh Kolhapur : गोकुळच्या बैठकीत सभासदांनी दोनचं प्रश्न विचारले, अन् संचालकांना बोलायला काही उरलचं नाही; नेमकं काय घडलं...

Raj Thackeray : मतदारयाद्यांवर काम करा; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT