R.madhwan  sakal
मनोरंजन

कोटींची घरं, लाखोंच्या गाड्या.. अशी आहे आर माधवनची लाइफस्टाइल

ओटीटीच्या जगात सगळ्यात आधी एन्ट्री मारली ती अभिनेता आर माधवनने.

सकाळ ऑनलाईन

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मच फॅड जास्तचं वाढल आहे. हेच कारण आहे की, अनेक दिग्गज कलाकारसुद्धा फिल्मसोबतच वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी कधीच सोडत नाही. पण तूम्हाला माहितेय ओटीटीच्या जगात सगळ्यात आधी एन्ट्री मारली ती अभिनेता आर माधवनने.

आर माधवन असा कलाकार आहे ज्याची फॅन फॉलोइंग फक्त बॉलीवूडपर्यंत मर्यादित नाही. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मोठ्या पडद्याशिवाय तो टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. आर माधवन दरवर्षी १ जूनला आपला वाढदिवस साजरा करतो.

झारखंडमध्ये जन्मलेल्या माधवनला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा होती. मुंबईच्या केसी कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांने आपलं संपूर्ण लक्ष अभिनयाकडे वळवलं.

१९९६ मध्ये 'इस रात की सुबाह नहीं' या चित्रपटातून त्यानं डेब्यू केला. त्यानं बऱ्याच तमिळ चित्रपटांमध्येही काम केले. पण 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटात त्याने आपला वेगळा ठसा उमटवला, या चित्रपटामुळे त्यांची इमेज चॉकलेट बॉय अशी झाली आणि पुढे त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक जबरदस्त चित्रपट दिले.

आर माधवनच्या वाढदिवसानिमीत्त त्याच्याची संबंधित काही गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर, साऊथ आणि हिंदी चित्रपटांसोबत अनेक वेब सीरिजमध्ये दिसलेला माधवन जवळपास १०३ कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून येते. एका चित्रपटासाठी तो सहा ते सात कोटी रुपये घेतो. याशिवाय तो चित्रपटांच्या कमाईतून प्रॉफिटचा शेअरही घेतो.

श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आर माधवनची सुद्धा गिणती होते. देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याची घर पहायला मिळतील आणि या आलीशान घरांची किंमत कोटींच्या घरात आहे. माहितीनूसार, चेन्नईमधल्या त्याच्या घराची किंमत १८ कोटी रुपये आहे. एवढचं नाही तर मुंबईत एका लग्जरी अपार्टमेंटचा तो मालक आहे.

अॅक्टिंगसोबत आर माधवन सगळ्यात जास्त चर्चेत असतो तो आपल्या लग्जरी गाड्यांमूळं. बीएमडब्ल्यू, ऑडी, रेंज रोव्हर सारख्या गाड्या त्याच्या पार्किंगमध्ये आहेत. बाईकचं तर त्याला वेगळच फॅड आहे. त्याच्याजवळ बीएमडब्ल्यूची १५०० जीटीएल बाइक आहे, ज्याची किंमत जवळपास २४ लाख आहे. यासोबत डुकाटी डिआवल आणि यामाहा V-मॅक्स या बाईकचा सुद्धा तो मालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT