Actor Ranbir Kapoor News
Actor Ranbir Kapoor News esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'पहिल्या बायकोला भेटलोच नाही!' रणबीर का म्हणतोय असं?

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट हे सध्या चर्चेत आले आहे. त्याचे कारण आलियानं आज (Ranbir - Alia Bhatt) सकाळी सोशल मीडियावर गुड न्युज दिली आहे. तेव्हापासून या सेलिब्रेटींवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली (Social media viral news) आहे. यासगळ्यात आलिया काही नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं आहे. तिनं हे सगळं प्रमोशनच्या निमित्तानं तर केलं नाही ना असा प्रश्न तिला विचारला आहे. दुसरीकडे रणबीरनं त्याच्या लग्नातील एक किस्सा सांगितला आहे.

रणबीरनं सांगितलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरल भयानीच्या इंस्टावरुन नेटकऱ्यांनी त्याविषयी वाचलं आहे. रणबीरनं चाहते किती (Alia bhatt news) क्रेझी असतात याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणतो, मलाही एक गोष्ट माहिती नव्हती. त्यादिवशी ती फॅन माझ्या घराच्या बाहेर आली होती. तिनं सोबत एका बाम्हणाला आणले होते. माझ्या वॉचमननं तिला त्याविषयी विचारणाही केली होती. मात्र तिनं त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. वॉचमन सांगत होता की, ती गेटजवळ आली आणि पुजा करुन त्याला गंध लावून परत गेली.

मी अजुन पर्यत माझ्या त्या पहिल्या बायकोला भेटलेलो नाही. मला आशा आहे की, केव्हातरी मी तिला पाहिल. रणबीरचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही दिल्या आहेत. एकीकडे रणबीर आणि आलियाला फॅन्सकडून नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला असला तरी रणबीरच्या त्या किश्यानं चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया - रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचे कारण त्यांनी काही वेळेपूर्वी सोशल मीडियावर शेयर केलेला फोटो. त्या फोटोमुळे येत्या काही दिवसांत आलियाच्या घरी पाळणा हलणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो फोटो शेयर केल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आलिया आणि रणबीरचं लग्न मुंबईतील आर के थिएटमध्ये झालं होतं. त्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT