मनोरंजन

बॉलीवूडमध्ये घडलं असं की, त्या अभिनेत्यानं ढाब्यावर केलं काम

वेगळेपणासाठी ते अभिनेते नेहमी चर्चेत राहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - वेगळेपणासाठी ते अभिनेते नेहमी चर्चेत राहिले आहे. त्यांच्या अभिनयाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. सुरुवातीला बॉलीवूडमध्ये मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलेल्या त्या अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये आपल्या संघर्षांची कहाणी सांगितली. त्यामध्ये बॉलीवूडमधील जाचाला कंटाळून दुसरं काम करण्यास सुरुवात केली. ज्या प्रमाणात त्यांना बॉलीवूडमध्ये संधी मिळाली त्याच पद्धतीनं त्रासालाही सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रापासून लांब जाणं पसंत केलं होतं. शेवटी अभिनयाची आवड आणि त्या क्षेत्रात काही करुन दाखविण्याची जिद्द यामुळे ते पुन्हा त्या क्षेत्रात परतले.

आपण चर्चा करत आहोत ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांची. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी मिश्रा ओळखले जातात. त्यांनी विनोदी ते गंभीर यासारख्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्या प्रेक्षकांच्या पसंतीसही पडल्याचे दिसून आले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण तिथे होणारं राजकारण. त्याला मी नेहमी बळी पडलो. जेव्हा मृत्युला मी जवळून पाहिलं तेव्हा हे क्षेत्र सोडण्याचा मी विचार केला. यामुळे गंगोत्रीच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिने मी तिथे कामही केले. अशी आठवण मिश्रा यांनी यावेळी सांगितली.

मिश्रा त्या ढाब्यावर मॅगी आणि ऑम्लेट विकत होते. ज्यावेळी त्यांना कळले की आपल्याला पोटाचा विकार आहे त्यावेळी त्यांनी ते काम सोडण्याचा निर्णय घेतला. आजारपणामुळे त्यांनी पुन्हा शहर गाठले. आणि बरे झाल्यानंतर पुन्हा बॉलीवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिश्रा हे गंगोत्रीच्या रस्त्यावरील एका ढाब्यामध्ये काम करत होते. काही जणांनी त्यांना ओळखलही होतं. संजय मिश्रा यांनी रोहित शेट्टीच्या ऑल द बेस्ट पासून पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT