मनोरंजन

कियारा सोबतचा किस स्क्रिप्टमध्ये होता की... सिद्धार्थनं दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) आणि कियारा अडवाणीचा (kiara adwani) शेरशहा (shershah) प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. त्याचवेळी मोठी स्टार कास्ट असलेला भुज द प्राईड ऑफ इंडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याच्या तुलनेत सिद्धार्थचा शेरशाह भाव खावून गेला. बॉक्स ऑफिसवर देखील त्याला मोठं यश मिळालं. त्याचं कारण त्याची कथा आणि कलाकारांचा अभिनय. सिद्धार्थच्या नावावर यशस्वी चित्रपटाची नोंद झाली. त्याच्या जोडीला कियारानं देखील चाहत्यांची पसंती मिळवल्याचे दिसुन आले. शेरशाहमध्ये सिद्धार्थ आणि कियाराचा एक किसिंग सीन आहे. त्यावरुन सिद्धार्थला विचारण्यात आले होते की, तो सीन स्क्रिप्टमध्ये होता की, त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावरुन तो चर्चेत आला आहे.

कियारा आणि सिद्धार्थची शेरशाहमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे हा चित्रपटही लोकप्रिय झाला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणूनही शेरशाहचा बोलबाला झाला. आयएमडीबीनं या चित्रपटाला 8.4 चे रेटिंग दिले होते. सिद्धार्थ आणि कियारा हे कपिल शर्माच्या शो मध्ये दिसुन आले. त्यावेळी कपिलनं आपल्या नेहमीच्या अंदाजा सिद्धार्थ आणि कियाराला त्यांच्या किसिंग सीनवेळी विचारलं होतं. कपिलचा प्रश्न असा होता की, त्याचा कियारासोबतचा किसिंग सीन हा स्क्रिप्टमध्ये होता की ती एक क्रिएटीव्ह अॅक्टिव्हिटी होती? त्यावर सिद्धार्थनं देखील गंमतीशीर उत्तर दिलं होतं.

सिद्धार्थनं उत्तर दिलं होतं की, आपण या चित्रपटामध्ये जे पाहतो आहोत त्यातील काही प्रसंग हे वास्तविक घटनेशी संबंधित आहे. त्यावर कपिल म्हणाला, शंभर टक्क्यांतील मी दहा टक्क्यांची गोष्ट करतो आहे, त्यावर सिद्धार्थला हसू आवरेना. तो म्हणाला, मला असे वाटत नाही. आम्ही सर्वांनी मिळून चित्रपटाला हातभार लावला आहे. त्यात सर्वांचे सहकार्य आहे. पण खरं सांगायचं तर मला तो सीन बळजबरीनं करावा लागला. ते माझ्यासाठी अवघड होतं. शेरशाहमध्ये सिद्धार्थनं एका सैनिकाची भूमिका साकारली होती. त्यात तो भलताच चमकून गेला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT