Sohail Khan Sakal
मनोरंजन

Sohail Khan: बहिणीच्या ईद पार्टीत जिमच्या कपड्यांमध्ये पोहोचला सोहेल खान... नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सलमान खानची बहीण अर्पिता खानने ईदच्या मुहूर्तावर एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते.

Aishwarya Musale

सलमान खानची लाडकी बहीण अर्पिताने ईदच्या निमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सलमान खानसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपली उपस्थिती नोंदवली. या पार्टीमध्ये भाईजानचा भाऊ सोहेल खानने चर्चा रंगवली असली तरी, या खास प्रसंगी सोहेल अगदी कॅज्युअल आउटफिटमध्ये जिम बॅग घेऊन पोहोचला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ आल्यापासून यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत.

अर्पिता खानच्या या शानदार पार्टीत सोहेल खान जिम बॅग घेऊन पोहोचला. यावेळी तो ग्रे शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये दिसला. कारमधून खाली उतरल्यानंतर तो पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावर काही यूजर्स त्याच्या स्माईलचे कौतुक करत आहेत, तर अनेक जण पार्टीमध्ये त्याची जिम बॅग आणल्याबद्दल त्याला ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर लोक कमेंट करत आहेत. "सोहेलने असे नव्हते येयला पाहिजे", असे म्हणत आहेत, तर काहीजण म्हणत आहेत 'ही काय नौटंकी आहे?'

अर्पिताने आयोजित केलेल्या या पार्टीत सलमान आणि अरबाज खान व्यतिरिक्त कार्तिक आर्यन, कंगना राणौत, कतरिना कैफ, इसाबेल कैफ, शहनाज गिल, पलक तिवारी आणि आयुष्मान खुरानासोबत त्याची पत्नी ताहिरा कश्यप, अनिल कपूर, मनीष मल्होत्रा, दिशा पटानी, इब्राहिम अली खान आणि किसी का भाई किसी की जानच्या स्टार कास्टनेही हजेरी लावली.

सोहेल खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्याने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. तो अखेरचा सलमान खान स्टारर दबंग 3 मध्ये दिसला होता. याशिवाय त्याने सलमान खानचा राधे या चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : वाहतूक कोंडीवर सोमवारपर्यंत अहवाल द्या, पुणे पालिका आयुक्तांचे आदेश

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT