Sonu Sood
Sonu Sood  Team esakal
मनोरंजन

'प्रत्येक बातमी, 'बातमी' नसते, तुमच्यावरही आहे देवाचा कॅमेरा'

युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात मोठी सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला एनसीबीनं केलेली अटक आणि त्याला न मिळालेला जामीन यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. आतापर्यत अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी शाहरुखला सपोर्ट केला आहे. त्यात सुनील शेट्टीपासून ऋतिक रोशनपर्यत अनेक अभिनेत्यांनी शाहरुखला पाठींबा देत आर्यनच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. आता यासगळ्यात अभिनेता सोनु सूदचं व्टिटही व्हायरल होताना दिसत आहे. त्यानं आर्यन प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमं यांच्यावर टीका केली आहे.

सोनूनं आपल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की, जे कोणी आर्यन प्रकरणाचं वार्तांकन करत आहे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये आर्यनचं वेगवेगळ्य़ा प्रकारे वार्तांकन केलं गेलं आहे. याबाबत सोनू आपल्या व्टिटमध्ये म्हणतो की, देवाचा कॅमेरा आपल्यावर आहे. तो आपल्यावर लक्ष ठेवून आहे हे विसरु नका. कुणाच्याही भावनांच्यामागे कॅमेरा घेऊन जाताना किंवा पळताना विचार करावा. कारण सध्या वेगळया पद्धतीनं एखाद्याला ट्रोल केले जाते. त्याच्यावर टीकाही केली जाते. त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या सोशल इमेजवर होत असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून आर्यन खान प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. शाहरुखनं आर्यला जामीन मिळावा म्हणून तो सतत प्रयत्नशीलही आहे. मात्र अजून त्याला यश आलेले नाही. एनसीबीनं कोर्टापुढे आर्यनचे व्हाटस अप चॅट सादर करुन आपल्याकडे त्याच्याविरोधात अनेक पुरावे असल्याचे सांगितले आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान सोनूनं केलेल्या व्टिटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक बातमी ही बातमी नसते. अशा शब्दांत माध्यमांना सोनुनं सुनावलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT