bollywood actor sushant singh rajput suicide case  Team esakal
मनोरंजन

एनडीपीएस कोर्टाकडून एनसीबीचं कौतूक

एनसीबीनं केलेल्या तपासातून सुशांत आत्महत्याप्रकरणातील वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या आणि त्या प्रकरणाच्या तपासाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आत्महत्या प्रकरणाची सर्व बाजुनं चौकशी करण्यात आली. त्यातून वेगवेगळे मुद्देही समोर आले होते. अजूनही तो तपास सुरुच आहे. एनसीबी अर्थात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं जी चार्जशीट बनवली होती त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ आणि एकुण 33 जणांना आरोपी केलं होतं. ते चार्जशीट एनडीपीएसच्या कोर्टात सादर केलं गेलं. त्यावेळी कोर्टान एनसीबीच्या तपासाचे कौतूक केले आहे. कोर्टानं असं म्हटलं आहे की, एनसीबीकडून प्राथमिकदृष्ट्या जो तपास करण्यात आला आहे त्याचा तपास चांगल्या पध्दतीनं झाला आहे.

एनसीबीनं ज्या आरोपींची प्राथमिक तपासणी केली आहे त्यातून सुशांतत्या आत्महत्येप्रकरणातील वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे यानिमित्तानं याचिकाकर्त्यांनाही दिलासा मिळणार आहे. सध्याच्या तपासातून मोबाईल रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे रेकॉर्डिंगही होते. सरतेशेवटी कुठल्याही प्रकरणाचा तपास करताना पुरावे जास्त महत्वाचे आहेत. त्यांच्यावर एखादी केस अवलंबून असते. या ही प्रकरणात पुरावे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. असेही कोर्टानं म्हटलं आहे.

आता एनडीपीएस कोर्टानं सर्व आरोपींना समन्स जारी केले आहे. मात्र कोरोनामुळे सर्व आरोपींना तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. कोर्टानं सांगितलं आहे, तारखेच्या दिवशी सर्व आरोपींना कोर्टात हजर राहावे लागेल. पुढील सुनावणीच्या वेळेस आरोपींच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 5 मार्च रोजी एनसीबीनं कोर्टात पत्र दिलं होतं. त्या प्रकरणाच्या संबंधात एजन्सीनं रिया चक्रवर्तीसह आणखी काही लोकांना अटकही केली होती. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ यांना जामीन मिळाला. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीनं मोठ्या प्रयासानं तपास सुरु ठेवला आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईनं 11 हजार 700 पानांची चार्जशीट फाईल केली होती. त्यात रिया चक्रवर्तीसह तिच्या जवळचे ड्रग्ज पेडलर यांचाही समावेश होता. एनसीबीचा हा रिपोर्ट केमिकल रिपोर्ट, व्हाटस अप चॅट, जप्त करण्यात आलेले संभाषण, यांच्यातून तयार करण्यात आला आहे. एनसीबीनं आपल्या भल्या मोठ्या रिपोर्टमध्ये सर्वाधिक डेटा हा डिजिटल स्वरुपात दिला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जूनला त्याच्या राहत्या घरी फास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या वडिलांनी सुशांतला आत्महत्या करण्यास रिया चक्रवर्तीनं प्रवृत्त केल्याचा आरोप करुन तिच्या विरोधात तक्रारही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT