मनोरंजन

जॅकलीनला गिफ्टमध्ये मिळाला 52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन ही तिच्या वेगळेपणासाठी प्रख्यात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन ही तिच्या वेगळेपणासाठी प्रख्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन ही चर्चेत आली आहे. ईडीनं सुकेश चंद्रशेखर त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य सहा लोकांच्या विरोधात 200 कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली होती. मनी लॉड्रींगच्या या प्रकरणात या आरोपींच्या विरोधात सात हजार पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. जेव्हा चंद्रशेखर यांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी त्यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचे नाव घेतले होते. त्यामध्ये त्यांनी आपण जॅकलीनला जे महागडे गिफ्ट दिले त्याचा खुलासा केला होता.

चंद्रशेखर यांनी केलेल्या खुलाशानुसार जॅकलीनला फर्नांडिझला 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची फारसी मांजर दिल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा चार्जशीटमध्ये आहे. त्या अभिनेत्रीचे नाव नोरा फतेही असे आहे. त्याचे कारण म्हणजे नोराला सुकेश यांच्याकडून एक महागडी कार गिफ्ट देण्यात आली होती. ईडीनंही आता या दोन्ही अभिनेत्रींशी चौकशी केली आहे. नोराची चौकशी झाल्यानंतर तिनं आपली बाजु एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती. अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, आपला मनी लॉड्रींगशी काहीही संबंध नाही. विनाकारण आपले नाव गोवले गेले आहे. आपण या प्रकरणामध्ये खूप मानसिक त्रास झाला आहे. जे कोणी आरोपी आहे त्यांच्याशी आपला काहीही एक संबंध नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोराला सुकेश चंद्रशेखर यांच्या पत्नीनं मला निमंत्रण पाठवले होते. आपण ज्यावेळी त्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा आपल्याला एक महागडी कार देण्यात आली होती. दरम्यान काही कालावधीपूर्वी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत जॅकलीनचा एक फोटो व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

SCROLL FOR NEXT