bollywood actress kangana ranaut birthday launch thalaivi trailer get emotinal at event of launching viral video.jpg 
मनोरंजन

थलाइवी'च्या ट्रेलर रिलीजला कंगना का झाली भावूक; पहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील बोल्ड वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. कंगना नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. मग ते सरकार विरोधी वक्तव्य असो वा बॅालिवूडमधील कलाकरांवरील टिका कंगना बिधास्त तिची मतं सोशल मीडियावर शेअर करते. ट्विटरच्या माध्यमातून कंगना आपली मत लोकांपर्यंत पोहचवते. अनेक वेळा तिच्या ट्विटमुळे तिला ट्रोल केले जाते. 

कंगनाचा 'थलाइवी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर २३ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटातील तिच्या तीन वेगवेगळ्या लुकचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. या चित्रपटामधून कंगना जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी हा प्रवास प्रेक्षकांना तिच्या अभिनयामधून दाखवला आहे. कंगनाच्या या लुकमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या वेळीस कंगनाचा एका व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होतोय. 

बॉलिवूडची 'कोन्ट्रवर्सि क्विन' या व्हिडीओमध्ये भावूक होताना दिसत आहे. ट्रेलर रिलीजच्या कार्यक्रमात कंगनाचा वाढदिवस चित्रपटाच्या टिमने साजरा केला. त्यावेळी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल बोलताना कंगाना भावूक झाली. ती म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यात कधीही अशा व्यक्तीला भेटले नाही, ज्याने माझ्या टॅलेंटवर शंका उपस्थित केली नाही. परंतु मला इथे सांगायला आवडेल की, ती एक अशी व्यक्ती आहे, ज्याने माझ्या टॅलेंटला नावाजलं आहे आणि चांगला प्रतिसादही दिला आहे. ज्या स्तरावर पुरुष नायकाचे चित्रपट बनवले जातात, त्यास्तरावर अभिनेत्रींचे चित्रपट बनवले किंवा दाखवले जात नाहीत. पण दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याकडून एखाद्या कलाकाराशी कसं वागायचं हे शिकले आहे. तसंच क्रिएटिव्ह पार्टनरशिप काय असते? हेही मला शिकायला मिळालं.' हा संवाद साधताना कंगना आपले अश्रू रोखू शकली नाही.'

या चित्रपटातील लूकचा फोटो शेअर करून कंगनाने कॅप्शन दिले होते, 'थलाइवीचा ट्रेलर मंगळवारी ( ता. २३ मार्च)ला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी मी 20 वजन वाढवले. त्यानंतर काही महिन्यांनी तेवढेच वजन कमी करावे लागले. हे चॅलेंज मला या महान बायोपिकसाठी घ्यावे लागले. 'थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजय यांनी केले आहे. कंगनासोबत या चित्रपटात भाग्यश्री, अरविंद स्वामी, समीरा रेड्डी, प्रकाश राज, अषतोश राणा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थलाइवीसोबतच कंगनाचे अनेक चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. 'धाकड' हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगना गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच कंगनाचा 'तेजस' या चित्रपटचा लूक देखील तिच्या वाढदिवसा निम्मीत प्रदर्शित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT