मनोरंजन

'ऑडी' घेतल्यावर चर्चा होणारचं! अभिनेत्री कियारा सुसाट...

बॉलीवूडमध्ये आपल्या हटकेपणामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी (bollywood actress kiara adwani) आता चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या हटकेपणामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी (bollywood actress kiara adwani) आता चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं खरेदी केलेली नवी कोरी ऑडी... ( Audi A8L) त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेयर केले आहे.आपल्या आवडत्या अभिनेत्रीनं ऑडी खरेदी केली. याचा चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी तिच्या त्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. कियारानं दोन कोटी रुपयांची ऑडी घेतली आहे. ऑडीशिवाय कियाराकडे बीएमडब्ल्यू एक्स5, बीएमडब्ल्यू 530 डी मर्सिडीज-बेंज ई-क्लास या गाड्या आहेत. सध्या कियाराच्या त्या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत.

कियारानं एम एस धोनी, कबीर सिंग, गुड न्युज, शेरशाह सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातून तिनं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळखही निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वोत्तम दहा अभिनेत्रींमध्ये कियाराच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. बॉलीवूडमध्ये तिला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहे. तिनं आपल्या प्रभावीपणे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयी सांगायचे झाल्यास ती कार्तीक आर्यनसोबत भुल भुलैय्याच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. याशिवाय तिच्या जुग जुग जियो चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

कियारा ही चित्रपटांशिवाय तिच्या सोशल मीडियावरील लूकसाठी प्रसिद्ध आहे. त्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. इंस्टावर वेगवेगळे फोटो शेयर करुन तिनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाहला चाहत्यांची पसंती मिळाली होती. त्यामध्ये तिनं प्रभावी काम केलं होतं. भूज द प्राऊड ऑफ इंडिया आणि शेरशाह हे एकाच वेळी ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. मात्र शेरशाहला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. त्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीची प्रशंसा चाहत्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT