मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चार वर्षाच्या मुलीनं विचारला घटस्फोटाचा प्रश्न

बॉलीवूड सेलिब्रेटी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या मुलीच्या प्रश्नावरुन चर्चेत आहे. त्या अभिनेत्रीचं नाव लारा दत्ता, लारा भलेही बॉलीवूडमध्ये फारशी चमकली नसली तरी तिच्या सोशल मीडियावरुन सक्रियतेमुळे नेहमीच चर्चेचा विषय असते. तिनं भारताचा माजी टेनिसपटू महेश भूपतीसोबत लग्न केलं. त्यानंतर ती काळ बॉलीवूडपासून लांब गेली. काही महिन्यांपूर्वी तिची एक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता लारा तिच्या मुलीच्या अजब प्रश्नावरुन चर्चेत आली आहे.

लाराच्या मुलीनं जो प्रश्न विचारला त्यामुळे लारालाही काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडला आहे. त्याचे काय आहे की, लाराची आगामी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या मालिकेचं नाव हिचकी और हुकअप असे आहे. ती त्या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी तिच्या चार वर्षाच्या मुलीनं सायरानं लाराला घटस्फोटावरुन एक प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये लारा निरुत्तर झाली आहे. लारानं ही पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेयरही केली आहे. सायरानं लाराला विचारलं की, घटस्फोट म्हणजे काय....आता यावर काय बोलावं असा प्रश्न लाराला पडला आहे. एवढ्या कमी वयाच्या मुलीला हा प्रश्न पडण्याची काय कारण...आणि तिला या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं असाही एक वेगळाच प्रश्न लाराला पडला आहे.

लारानं यापुढे असाही एक खुलासा केला आहे की, आम्ही जेव्हा फ्रेंड्स नावाचा शो पाहत होतो तेव्हा तिला घटस्फोटाविषयी सांगितलं होतं. त्यावेळी तिनं एक प्रश्न उपस्थित केला होता. फ्रेंडस शो तिचा फार आवडता आहे. ती मालिका पाहत असताना तिला अनेक प्रश्न पडतात. अशावेळी त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे आमच्यासाठी मोठा टास्क असल्याचेही लारानं सांगितलं. सध्या तिची आणि तिच्या लेकीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT