nora fatehi
nora fatehi 
मनोरंजन

'हाय गर्मी!'; नोराच्या हॉट फोटोने नेटकऱ्यांना लावलंय याड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड अंदाजाने आणि नृत्याने नोरा फतेहीने नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिच्या सौदर्याने आणि आदाकारीने ती चाहत्यांना घायाळ करते. वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून नोरा तिचे डान्स स्किल दाखवत असते. नोराची 'दिलबर दिलबर' आणि 'हाय गर्मी' हे गाणी खूप गाजली. त्यातील दिलबर या गाण्यातील नोराचा बेली डान्सने प्रेक्षकांचे मन जिंकले त्यानंतर बॅलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल सोबत नोराचे 'बडा पचताओगे' हे गाणे देखाल खूप गाजले या गाण्यातील विकी आणि नोराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 

नुकताच नोराने एक हॉट लूकमधील फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने चंदेरी रंगाचा वन पिस ड्रेस घातला आहे. या ड्रेसला मॅचिंग हिल्स घालून नोराने हटके पोज दिली आहे. या  फोटोला कॅप्शन देत नोराने कॅप्शन दिले,' Wet hair, bronzed skin...' मला नाही वाटत की तुम्ही असं करू शकता.' नोराच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 1लाख 67 हाजाराहून अधिक लाइक्स नोराच्या या फोटा मिळाले आहेत. नोराचा सोशल मिडीयावरील तिचा चाहता वर्ग मोठा आहे. 

नोरा लवकरच 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे. . या चित्रपटाची कथा भारतीय वायुदलातील वैमानिक विजय कर्णिक यांच्यावर आधारित आहे. नोरा सोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगण हे प्रसिध्द कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  नोराने  2016 मध्ये  'झलक दिखलाजा' या रियालिटी शो सहभाग घेतला होता. तसंच ती बिग बॉसमध्ये सुद्धा सहभागी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT