मनोरंजन

'त्या मुलांचं आयुष्य उद्धवस्त करुया', सोमी अली संतापली

बॉलीवूडमध्ये शाहरुख खानच्या मुलाची आर्यन खानच्या कोठडीवर आता त्याच्या वकीलांनी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये शाहरुख खानच्या मुलाची आर्यन खानच्या कोठडीवर आता त्याच्या वकीलांनी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. अद्याप त्याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे येत्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणात आतापर्यत अनेकांनी शाहरुखच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. त्यावर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं काही दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.

आर्यन खाननं ड्रग्ज घेतलं तर काय झाले, या वयात मुले ड्रग्ज घेतातच. मी देखील बॉलीवूडमधील अभिनेत्रींसोबत ड्रग्ज घेतले होते. असे धक्कादायक वक्तव्य करुन तिनं आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविषयी सहानुभूती दर्शवली होती. त्यामुळे चर्चेत आलेल्या सोमीनं सातत्यानं आर्यन खानच्या बाजूनं प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. शाहरुख सध्या वेगळ्या परिस्थितीतून जात असल्यानं त्याला सपोर्ट करण्यासाठी बॉलीवूडमधील अनेकांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आर्यन खान 30 ऑक्टोबरपर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. सलमाननं आतापर्यत दोन वेळा शाहरुखची त्याच्या घरी भेट घेतली होती. त्याच्यासोबत सलीम खानही होते. सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

सोमी अलीनं लिहिलं आहे की, चला आता एका 23 वर्षीय युवकाचं आयुष्य उद्धवस्त करुन टाकूया, सध्या सगळीकडून तसा प्रयत्न केला गेला आहे. पोलीस फारच संवेदनशीलपणे कायद्याचा अवलंब करत आहे. हे पाहून आश्चर्य वाटण्यासारखे आहे. हा नेमका काय प्रकार आहे, जे चालले आहे ते न्याय आहे का, मात्र जे सुरु आहे त्यातून त्या मुलांच्या आय़ुष्याशी खेळण्याचा प्रकार दिसून आला आहे. आणि सगळे मिळून त्या मुलांचं आयुष्य उद्धवस्त करताहेत. अशी प्रतिक्रिया सोमीनं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Theatre Collaboration : सहयोग, संवाद आणि विश्वासातून घडणाऱ्या नाटककलेचा सर्जनशील प्रवास

Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Indian Cinema History : ‘प्रकल्पवाटा’ पुस्तकातून उलगडते विद्यार्थीकेंद्रित प्रभावी आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती

Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

SCROLL FOR NEXT