Sushmita sen
Sushmita sen esakal
मनोरंजन

तिला कुठं जास्त इंग्रजी यायचं पण, झाली 'मिस युनिव्हर्स'

सकाळ डिजिटल टीम

Sushmita Sen: बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून सुश्मिता सेनकडे (Actress Sushmita Sen) पाहावे लागेल. या (Bollywood News) अभिनेत्रीनं मोठ्या संघर्षानं बॉलीवूडमध्ये स्वताची क्रेझ निर्माण केली. ती 1994 मध्ये मिस युनिव्हर्स (Miss universe) झाली. त्या (Bollywood Actress) इव्हेंटचा एक किस्सा त्यावेळी खूप फेमस झाला होता. त्याविषयी सुश्मिता नेहमीच चाहत्यांना सांगत असते. आता पुन्हा तिनं तो किस्सा एका मुलाखतीच्या निमित्तानं सांगितला आहे. आपल्याला इंग्रजी येत नसताना देखील मिस युनिव्हर्स (Bollywood Actress) होता आलं. प्रश्न भाषेचा नव्हता तर तो तुमच्या आत्मविश्वासाचा होता. असं या मुलाखतीच्या दरम्यान सुश्मितानं सांगितलं होतं.

सुष्मितानं सांगितलं, माझं शिक्षण हे हिंदी मीडियममध्ये झालं होतं. त्यामुळे मला फारसं इंग्रजी काही येत नव्हतं. ती भाषा बोलण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र जेव्हा मी त्या युनिव्हर्सच्या स्पर्धेत गेले तेव्हा मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे मी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं होतं. ते परीक्षकांना कमालीचे आवडले होते. ते माझ्यावर खुश झाले. त्यावेळी साक्षात देव माझ्या बाजुनं होते की काय असे तेव्हा मला वाटून गेले होते. त्यांनी माझ्याकडून त्या भाषेत वदवून घेतलं की काय हा प्रश्न मला अजूनही पडतो.

त्यावेळी सुष्मितानं सांगितलं होतं की, महिलाच्या रुपानं जन्म मिळणं ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. मी त्याच्यावर अजूनही ठाम आहे. तुम्ही बाईच्या जन्माला येणं ही मोठी बाब आहे. तो देवानं तुमच्यावर केलेली मोठी कृपा आहे. मात्र हल्ली त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. बाई म्हणजे केवळ पोटातील गर्भ नाही. ती एक संस्कृती आहे. जन्मभर आपल्याला पुरणारी शिदोरी आहे. आपल्याला कुटूंबाशी जोडून ठेवणारी मोठी नाळ आहे. आपण यासगळ्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. दुर्देवानं याकडे कुणी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT