i for india 
मनोरंजन

कोरोनाच्या लढाईत सेलिब्रिटींचं 'आय फॉर इंडिया'

सकाळवृत्तसेवा

मुंबई:  सध्या सर्व जगात कोरोना विषाणूची भयंकर साथ पसरली आहे. भारतात पण याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून सरकारकडून वेळोवेळी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. यात बॉलिवूड सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुद्धा अनेक कलाकार करत आहेत. नुकताच मदत निधी उभारण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी आय फॉर इंडिया या डिजिटल कॉन्सर्टचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमातून आतापर्यंत साडे तीन कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. 

आय फॉर इंडियाचा हेतू काय?
या कार्यक्रमातून कोरोना विरोधात लढा देणाऱ्या प्रत्येक कोरोना योद्धाचे अभिनंदन करण्यात आले. रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता फेसबुकच्या फेसबुक ऍप इंडिया या पेजवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील 80 हुन अधिक कलाकारांनी सहभाग  घेतला होता. या कार्यक्रमात दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रद्धांजली देखील देण्यात आली. कोरोनाच्या लढाईत लढा देण्यासाठी निधी उभारण्यात यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून किमान 150 रुपये दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

जगभरातून कौतुकाचा वर्षाव:
जगभरातून या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. हॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने भारताचे कौतुक केले तो म्हणाला कि, " माझ्या ह्रदयात भारतासाठी एक विशेष स्थान असून मी माझ्या कुटुंबासह भारतात बराच वेळ घालवला आहे. खरतर सध्या मी माझ्या घरापासून दूर असल्याची माझ्या मनात भावना आहे." पुढे त्याने भारतातील  शेकडो गरीब  कुटुंबाना मदत करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. 

शाहरुख खानचा या कार्यक्रमात अनोखा अंदाज: 
या कार्यक्रमात शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसाठी एक गाणं सुद्धा गायले आहे. ते गाणे ऐकून सर्वानाच आनंद झाला. या गाण्याच्या माध्यमातून सर्व काही ठीक होईल असा आत्मविश्वास शाहरुख खानने दाखविला. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या लहान मुलगा अब्राहामची सुद्धा एंट्री दाखविण्यात आली असून शाहरुख त्याच्यासोबत खेळत असताना दिसत आहे. 

प्रियांका चोप्राने वाचली सुंदर कविता: 
प्रियांका चोप्राने या कार्यक्रमात एक सुंदर कविता सादर करत नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले तसेच तिने डॉकटर आणि पोलिसांच्या कामाला सलाम सुद्धा केला आहे. तिने नागरिकांना दान करण्याचे आवाहन करत यातुन अनेक लोकांचे प्राण वाचतील अशी भावना व्यक्त केली आहे. 

बॉलिवूडच्या या कलाकारांचाही दिसला सहभाग:
या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अक्षय कुमार, आमिर खान, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, ट्विंकल खन्ना, ऐश्वर्या राय बच्चन, रणवीर सिंग, वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन सारख्या कलाकारांचा समावेश होता. याशिवाय पापोन, अरिजीत सिंग, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, रेपर्स दिव्य आणि बादशाह  हेही यात दिसले. आयुष्मान खुराना, दिया मिर्झा, भूमी पेडणेकर, कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि विक्की कौशल यांनीही चाहत्यांना कोरोनाशी झुंज देणाऱ्यांना  मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra farmer loan waiver : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा, काय आहेत नियम ? अहिल्यादेवी होळकरांचे दिले नाव

वाढवण बनेल ‘चौथी मुंबई’, १,२०० किमी मेट्रो, ६,००० किमीचा एक्सप्रेसवे अन्...; अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठा मास्टरप्लॅन, तरतुदी काय?

Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांचे स्वप्न भंगले! वाढीव निधीच नाहीच, महायुती सरकारचा यू-टर्न; अर्थसंकल्पात मोठी निराशा

IND vs NZ Final Rule : ... तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद दिले जाणार! T20 World Cup फायनलसाठी ICC चा नियम घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT