Asha Parekh on pathaan controversy Google
मनोरंजन

Asha Parekh: दीपिकाच्या भगव्या बिकिनी वादावर स्पष्टच बोलल्या आशा पारेख; म्हणाल्या,'आजकाल..'

आशा पारेख यांनी एका मुलाखतीत बॉलीवूडच्या सध्याच्या ढासळत्या परिस्थितीवर थेट भाष्य करत आपला संतापही व्यक्त केला आहे.

प्रणाली मोरे

Asha Parekh: शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं सुरु झालेला वाद काही थांबायचं नाव घेईना. वेगवेगळ्या स्तरावरनं लोक प्रतिक्रिया देत आगपखड करताना दिसत आहेत. दीपिका पदूकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं सुरु असलेल्या वादावर आता बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि आपला संताप व्यक्त केला आहे.(Asha Parekh on pathaan controversy)

आशा पारेख यांनी हिंदी सिनेमांचा एक काळ गाजवलाय तो आपल्या दिलखेचक अदांनी..त्यांचे लाखो चाहते होते...तर आजही त्यांच्या चाहत्यांची कमी नाही..टी.व्ही वर आजही त्यांचे सिनेमे आवडीने पाहिले जातात. आशा पारेख यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या इंडस्ट्रीतील प्रवासावर भाष्य केलं. त्याचवेळी आशा पारेख पठाण विवादावर देखील बोलल्या. त्यांनी सिनेमातून हद्दपार होत चाललेल्या गाण्यातील मेलडीविषयी देखील भाष्य केलं.

आशा पारेख यांनी आजकालच्या सिनेमांवर भाष्य करत म्हटलं आहे की...''जे एंटरटेन्मेंट सिनेमे असतात,त्यात बिचाऱ्या अभिनेत्रींना काही करण्यासारखं राहत नाही. पण जे काही मोजके स्त्री केंद्रित व्यक्तीरेखांवर बनलेले सिनेमे असतात ते खरंच सर्वोत्तम बनतात. पण आज जे काही मोठ्या बॅनरचे,बड्या स्टार्सचे सिनेमे बनतात,त्यातील अभिनेत्रींच्या भूमिका खूप छोट्या असतात. स्क्रीवर अगदी थोड्या वेळासाठी दिसतात अभिनेत्री. ही इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे,आणि मला यात बदल झालेला पहायचा आहे''.

आशा पारेख म्हणाल्या की, ''सिनेमातून आता प्रेम आणि मेलडी हद्दपार झालंय. सिनेमाच्या कथेतला प्राण निघून गेला आहे. सिनेमाला आत्माच नाही. सिनेमाचं कथानक चांगलं नसेल तर तो चालत नाही. माझ्या 'चिराग' सिनेमात मी एका अंध मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती. तो सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. पण प्रेक्षकांना तो फार आवडला नव्हता. सिनेमात मला अंध मुलीच्या भूमिकेत पाहणं लोकांना रुचलं नव्हतं. पण प्रेक्षकांना तेव्हा ते तसं का केलं हे पटवून देणं कठीण होतं''.

आशा पारेख पुढे म्हणाल्या, ''बॉलीवूड इंडस्ट्री मरतेय.आता अभिनेत्रीनं भगव्या रंगाचं काही घातलं तर त्यांच्यावर बंदी आणली जातेय.सिनेमे चालत नाहीत. परिस्थिती गंभीर बनत चाललीय. बॉयकॉटनं देखील सिनेमांचे नुकसान होत आहे. लोक असेही थिएटरमध्ये जात नाहीत.आणि असंच जर सिनेमांची परिस्थिती राहिली तर दुसरे सिनेमे कसे बनणार. अशाने संपूर्ण इंडस्ट्रीचाच विनाश होईल''.

आशा पारेखना पठाण च्या गाण्यावरनं सुरु असलेल्या वादावर जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या,''भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं लोक वाद घालताना दिसतायत. आपण खूपच छोटे विचार करु लागलोय..आणि हे खूप चुकीचं आहे. बॉलीवूडला खूप आधीपासून असं टार्गेट केलं जात आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT