Bollywood Movie Samrat Prithviraj movie
Bollywood Movie Samrat Prithviraj movie esakal
मनोरंजन

Samrat Prithviraj: RSS चे सरसंघसंचालक मोहन भागवतांसाठी खास स्क्रिनिंग

युगंधर ताजणे

Samrat Prithviraj Movie: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या (Bollywood Actor) हटकेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सध्या त्याच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आज हा चित्रपट (Akshay Kumar) प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याला आपलं नाणं सिद्ध करण्यासाठी आणखी दोन चित्रपटांशी फाईट द्यावी लागणार आहे. त्यातला एक चित्रपट आहे (Bollywood Movie) टॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal hassan) यांचा विक्रम. मेजर हा चित्रपट देखील आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही (Bollywood Vs Tollywood) दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा जोरदार संघर्ष सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये टॉलीवूडच्या चित्रपटांनी बाजी मारली आहे. त्यामुळे येत्या काळात बॉलीवूडच्या चित्रपटांना घवघवीत यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

अक्षय कुमारच्या पृथ्वीराजची प्रेक्षक ही गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. त्याच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. संजय दत्त, मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका त्यात आहेत. आता या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आरएसएसचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे महत्व अधिक लोकांपर्यत पोहचावे आणि भारतातील दैदिप्यमान अशा ऐतिहासिक परंपरेला पुन्हा उजाळा मिळावा असा उद्देश त्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चित्रपटाची पूर्ण स्टारकास्ट तसेच दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी उपस्थित राहणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना अक्षयनं सांगितलं की, सम्राट पृथ्वीराज हे महान योद्धा होते. या चित्रपटातून त्यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. भारताच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या पृथ्वीराज यांच्याविषयी आताच्या पिढीला फारशी माहिती नाही. त्यामुळे त्यांची ओळख यानिमित्तानं करुन देता येणार आहे. भागवत यांना आम्ही आमच्या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगसाठी निमंत्रित केले आहे. भारत मातेची एक इंच जागाही परकीय आक्रमकांना देणार नाही अशी भूमिका घेतलेल्या सम्राट पृथ्वीराज यांचा संघर्ष प्रेक्षकांना भावेल असा आशावाद अक्षयनं यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT