Ramcharan & Jr.NTR (RRR Movie Actors)
Ramcharan & Jr.NTR (RRR Movie Actors) Google
मनोरंजन

RRR: रामचरण विनाचप्पल एअरपोर्टवर: चाहत्यांना सांगितलं त्यामागील कारण

युगंधर ताजणे

RRR Movie: एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर (RRR Movie News) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड कमाई केली आहे. गेल्या आठवड़्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर, रामचरण, (Entertainment News) आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका (SS Rajamaulil) आहेत. दोन स्वातंत्र्यवीरांची संघर्षगाथा आरआरआरमध्ये मांडण्यात (Bollywood News) आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. मात्र कोरोनाचा मोठा सर्वच मनोरंजन क्षेत्राला बसला होता. त्यामुळे दोनवेळा आरआरआऱच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता तर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

आरआरआरमधील अभिनेता रामचरण याला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यावेळी फोटोग्राफर्सनं त्याच्या टिपलेल्या फोटोंमध्ये तो अनवाणी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी त्यावरुन प्रश्न विचारले आहेत. रामचरणचा तो फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंटसही दिल्या आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये आरआऱआरचा फिव्हर सुरु आहे. दोनशे कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱा हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शिच झाला आहे. जगभरामध्ये तर 800 कोटींहून अधिक व्यवसाय केल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे. मुंबई एअरपोर्टवर रामचरण अनवाणीच दाखल झाला तेव्हा त्याचा तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले.

रामचरणनं आपण अनवाणी का आलो याचे कारण सांगितलं आहे. त्यामध्ये त्यानं त्या धार्मिक कारणाचा उल्लेख केला आहे. पहिल्यांदा तर त्याच्या चाहत्यांना आश्चर्यच वाटले की, रामचरणनं असं का केलं असेल.... त्याचे झाले असे की, रामचरणनं 41 दिवस भगवान अयप्पा यांची दीक्षा घेतली आहे. ती दीक्षा घेतल्यावर 41 दिवस अनवाणीच राहावे लागते. असे रामचरणनं सांगितलं आहे. सोशल मीडियावर मात्र रामचरणच्या चाहत्यांनी त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, विनम्रता काय असते हे साऊथच्या कलाकारांकडून शिकावे. मोठं यश मिळाल्यानंतर जमिनीवर राहणे काय असते हे त्या कलाकारांनी दाखवून दिले आहे. असे त्या नेटकऱ्यांनं म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT