Vivek Agnihotri news
Vivek Agnihotri news  esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'आमिर खान फसवा माणूस, लोकांना बनवलं मुर्ख!'

युगंधर ताजणे

Vivek Agnihotri troll Aamir Khan: आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावरील काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकांचा विवेक अग्निहोत्रींचा राग अद्यापही शांत झालेला नाही. एका मुलाखतीतून त्यांनी पुन्हा एकदा आमिरवर तोफ डागली (boycott bollywood) आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या लाल सिंग चढ्ढानं सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्यावर झालेली बहिष्काराची मागणी, त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि यासगळ्यात (entertainment news) आमिरनं दिलेली प्रतिक्रिया हे सारं चर्चेत आलं आहे. अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा आमिरवर तोफ डागली आहे. त्यामुळे अग्निहोत्री यांच्यावर देखील नेटकऱ्यांनी टीका केली आहे. अग्निहोत्रींनी आमिरला धोकेबाज (laal singh chadha) असं म्हटलंय.

लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्यापासून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. आमिरला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. आमिरच्या पत्नीनं किरण रावनं एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याचा फटका त्याला बसल्याचे बोलले जात आहे. आमिरनं यासगळ्या प्रकरणावर माफीही मागितली होती. त्यानं दोनवेळा चाहत्यांची माफी मागूनही त्यावर नेटकऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यात बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी त्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अग्निहोत्री यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे की, बॉयकॉट बॉलीवूडमुळे आमिरच्या फिल्मचे नुकसान झाले असे मला वाटत नाही. त्याचा गैरप्रचार करण्यात आला आहे. आमिरनं त्या चित्रपटासाठी कोणतीही मेहनत घेतलेली नाही. त्यामुळे तो फ्लॉप झाला आहे. कुशल मेहराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अग्निहोत्री यांनी परखडपणे आपले म्हणणे मांडले आहे. मी काय म्हणतो आहे हे आमिरला समजेल असे मला वाटते. सध्या इंडस्ट्रीला भक्तांनी उद्धवस्त करुन टाकले आहे असे सांगितले जात आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही ती म्हणजे मोदींना भारतात मिळालेल्या मतांची टक्केवारी 40 टक्के एवढी आहे.

आतापर्यत 40 ते 50 टक्के लोकांनी फिल्मला बॉयकॉट केले आहे. आता मला सांगा उर्वरीत 50 टक्के लोकांनी चित्रपट का पाहिला नाही. बॉयकॉट केल्यानंतर आमिर चाहत्यांसमोर आला आहे. हे जास्त महत्वाचे आहे. यापूर्वी त्याला असे कधी सोशल मीडियावर बोलताना पाहिले आहे. प्रेक्षकांना गृहित धरणे हेच त्याला जास्त महागात पडले आहे. तुमच्याकडे जर चाहते नाहीत तर मग तुम्ही दीडशे ते दोनशे कोटी कशाचे घेता, तुम्ही एक बोगस आणि फ्रॉड व्यक्ती आहात हे यावरुन सिद्ध होते. अशाप्रकारची प्रतिक्रिया अग्निहोत्री यांनी यावेळी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT