Brahmastra Part 2 Movie News Esakal
मनोरंजन

Brahmastra Part 2: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची वर्षपुर्ती! ब्रम्हास्त्र २ विषयी मेकर्सची मोठी घोषणा

Vaishali Patil

Brahmastra Part 2 Movie News: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट या जोडीचा 'ब्रह्मात्र' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला.

गेल्यावर्षी हा 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई तर केली मात्र या चित्रपटातील आलिया रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खुप आवडली. या शिवाय या चित्रपटातील VFX, डायलॉग्स याचेही बरेच कौतुक झाले. गेल्या वर्षी 9 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे पुढिल भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता त्यातच चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने पुढील भागाची माहिती चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

अयानने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे छोटे छोटे भाग ,काही फोटो एकत्र करून एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने चित्रपटातील अप्रतिम दृश्येही दाखवली आहेत.

याच व्हिडिओच्या शेवटी अयानने ब्रह्मास्त्राच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचीही माहिती दिली आहे. अयान मुखर्जीने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या शेवटी त्याने लिहिले आहे- ब्रह्मास्त्र पार्ट टू आणि थ्री इन प्रोग्रेस.

या व्हिडिओच्या कॅप्शनध्ये अयान लिहितो की, "पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्रह्मास्त्र. तुमची सर्जनशीलता, तुमची सर्व मेहनत आणि चित्रपट निर्मिती आणि जीवनात दिलेल्या महत्वाचे धडे दिल्याबद्दल धन्यवाद. ब्रह्मास्त्र प्रवासाच्या पुढच्या टप्प्यातील काही सुरुवातीच्या काही कलाकृती लवकरच घेऊन येत आहोत."

हा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी आणि चित्रपटाचे चाहते यावर प्रतिक्रिया देत आहे. त्याचबरोबर त्यांनी अयानकडे वेगवेगळ्या मागण्यादेखील केल्या आहेत.

एकानं लिहिलयं की, या भागात दीपिकाला अमृताच्या भूमिकेत आणि रणबीरला देवाच्या भूमिकेत कास्ट करा. तर एकानं लिहिलयं की, दुसऱ्या भागात अस्त्राबद्दल अधिक दाखवा तर काहींनी या टिमला वर्षपुर्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, आता देव इतका ताकदवान झालेला आहे की तो कोणाच्याही नियंत्रणात राहत नाही आणि फक्त त्याचा मुलगा शिवच त्याला थांबवु शकेल. व्हिडिओमध्ये शिव त्याचे वडील देव यांच्यावर एकाच वेळी सर्व शस्त्रे वापरताना दिसत आहे. देव नेहमीप्रमाणे शिवासमोर त्रिशूळ घेऊन उभा आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त मौनी रॉय आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणही दिसले. आता दुसऱ्या भागात कोणते कलाकार दिसणार याची चर्चा होऊ लागली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात 269.4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 431कोटी रुपयांची कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: भांडुपमधील 115 मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार अडचणी

SCROLL FOR NEXT