Kesariya Song Reality
Kesariya Song Reality esakal
मनोरंजन

Kesariya Song Reality: चोरलेलं गाणं एवढं काय कौतूक, चांदणीनं केली पोलखोल!

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Song Kesariya: भलेही ब्रम्हास्त्रची आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढासारखी किंवा अक्षय कुमारच्या रक्षाबंधनसारखी गत झाली नसली तरी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होताना दिसत आहे. काही दिवसांपासून ब्रम्हास्त्रवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती. मात्र त्याकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष करुन त्याला मोठा प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर देखील त्यानं विक्रमी कमाई केली. चारशे कोटींचं बजेट असलेल्या ब्रम्हास्त्रमधील केसरिया गाण्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चांदणी नावाच्या आर्टिस्टनं ते गाणं दुसऱ्या एका गाण्यावर आधारित असून त्याचे श्रेय दुसऱ्यांनीच घेतल्याचे म्हटले आहे. यापूर्वी देखील ब्रम्हास्त्रमधील केसरियावर कॉपी पेस्टचा आरोप करण्यात आला होता. आता त्या व्यक्तीनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे गाण्याची धुन चोरण्यात आली हे सांगितले आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

साधारण दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ब्रम्हास्त्रला अजुनही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आतापर्यत या चित्रपटानं तीनशे कोटींहून अधिक कमाईही केली आहे. ब्रम्हास्त्रमधील पहिलं गाणं केसरियावर झालेल्या चोरीच्या आरोपानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गाण्याचे बोल आणि त्याची धून हे दोन्हीही दुसऱ्या एका गाण्यावरुन घेतल्याचे चांदणी नावाच्या आर्टिस्टनं म्हटले आहे.

चांदणीनं तिच्या इंस्टावरुन असा दावा केली आहे की, हॅरी मेट सेजल नावाच्या चित्रपटातील हवाए नावाचे जे गाणे आहे त्यावरुन केसरियाची रचना करण्यात आली आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करुन आपला राग व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT