CAA protest actor Javed jaaferi quiets twitter 
मनोरंजन

जावेद जाफरी CAA वरुन झाला ट्रोल, कंटाळून सोडलं ट्विटर !

वृत्तसंस्था

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) विरोधात आंदोलन होत आहे. राजकीय नेते, सामान्य लोकांपासून कलाकार मंडळीही ट्विट करत आहेत. ट्विट करत या कायद्याला काहीजण आपला पाठींबा दर्शवत आहेत तर काही कलाकार मंडळी वादग्रस्त ट्विट करत आहेत. याच वादाला नवे तोंड फुटलं असून अभिनेता जावेद जाफरीनेही चक्क ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आणि या कायद्याच्या समर्थनात देशात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मात्र केंद्र सरकार वारंवार सांगत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान सोशल मीडियावरही CAA आणि NRC वरुन नेटकऱ्यांमध्ये वाद पेटला आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी उडी घेतली. पण कलाकारांना त्यामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. याच वादाला आणि ट्रोलिंग कंटाळून जावेद जाफरीने सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. 

CAA आणि NRC ला विरोध करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये जावेद जाफरीचाही समावेश आहे. विरोध करणाऱ्या इतर कलाकारांप्रमाणेच जावेदलाही ट्विटरवर  ट्रोल केलं गेलं. यालाच कंटाळून त्याने अखेर ट्विट केलं. ट्विट करताना त्याने लिहिलं आहे, 'ट्रोलिंग आणि द्वेष आता सहन होत नाही. जोपर्यंत परिस्थिती मुळ पदावर येत नाही तोपर्य़ंत सोशल मीडियाचा मी निरोप घेत आहे.' 

जावेदला केलं ट्रोल कारण...
जावेदचा CAA आणि NRC ला विरोध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियवर व्हारल झाला होता. त्यामध्ये तो सरकारविरोधात भाषण करताना दिसतो आहे.  शिवाय त्याने CAA आणि NRC ला विरोध करणारे अनेक व्हिडीओ शेअर केले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT