CM Yogi Adityanath expects Film City project  esakal
मनोरंजन

Yogi Adityanath : सहा महिन्यात दुसरी फिल्मसिटी उभारणार, योगींची मोठी घोषणा!

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यावेळी फिल्मसिटीच्या स्थलांतराऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा असे आवाहन योगींना केले होते.

युगंधर ताजणे

CM Yogi Adityanath expects Film City project : नव्या फिल्मसिटीबाबत आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमधील फिल्मसिटी दुसरीकडे स्थलांतरीत करण्याविषयी चर्चेला उधाण आले होते. त्यावर आता योगींनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यावेळी फिल्मसिटीच्या स्थलांतराऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा असे आवाहन योगींना केले होते. तसेच प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनं देखील मुंबईतील फिल्मसिटीवरुन योगींची भेट घेऊन त्यांना नव्यानं कोणते प्रोजेक्ट हाती घेता येतील याविषयी सुचवले होते. आता योगींनी नव्यानं केलेल्या घोषणेची चर्चा सुरु झाली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

योगींनी आता उत्तर प्रदेशमध्ये येत्या सहा महिन्यांच्या काळात नव्यानं फिल्म सिटीची निर्मिती विषयी सुतोवाच केले आहे. त्याच्या आराखड्याचे काम सहा महिन्यात पूर्ण होणार असून त्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची निर्मिती केली आहे आणि त्याचे अध्यक्षस्थान योगींकडे आहे. आम्ही नव्यानं जी फिल्म सिटीची उभारणी करत आहोत त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये विकासाची नवे धोरण उभे केले जाणार आहे. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.

उत्तर प्रदेशाची प्रतिमा बदलण्यासाठी यासारखे नवे प्रोजेक्ट महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच प्रशासनानं वेगानं काही धोरणं राबविण्याचे ठरवले आहे. येत्या सहा महिन्यात चित्र वेगळे दिसेल. या फिल्मसिटीच्या निमित्तानं केवळ भारतच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या दिग्गज सेलिब्रेटींना त्यांच्या कलाविष्काराचे प्रदर्शन करण्याची यानिमित्तानं संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील कलाकारांसाठी देखील हा प्रोजेक्ट महत्वाचा ठरणार आहे.

याशिवाय योगींनी राज्याच्या विकासाविषयी बोलताना म्हटले की, ही नव्यानं तयार होणारी फिल्म सिटी ही फक्त फिल्म मेकर्स, रियॅलिटी शो करणाऱ्यांसाठी महत्वाची नसेल तर विविध राज्यांतील नवोदित कलाकारांना पाठबळ देण्याचे काम यानिमित्तानं केले जाणार आहे. त्यातून त्यांना आणखी नवीन संधी उपलब्ध होतील. असा विश्वास योगींनी व्यक्त केला आहे.

या नव्या प्रोजेक्टविषयी वेगवेगळ्या निर्मात्यांना डिझायनिंगच्या संदर्भात सुचना करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या सुचनेनुसार त्यात बदल केले जाणार आहे. फिल्म सिटीसाठी पहिले टेंडर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: माझ्या मुलाची राख चोरीला गेली... गोकर्ण जंगलाच्या गुहेत सोपडलेल्या रशियन महिलेचा धक्कादायक आरोप!

Success Story: 'अंध प्रियांका बनली महसूल सहाय्यक'; परिस्थितीशी दोन हात करत यशाला गवसणी, शेणोलीतील युवतीची प्रेरक कहाणी

Nagpur News: जन्मठेपेच्या कैद्याने कारागृहात संपवलं जीवन

100 टक्के मतदार, 'ती' 14 गावं लवकरच महाराष्ट्रात घेणार; सीमाभागातील गावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तून शेतीसाठी पाणी; डाव्या-उजव्या कालव्यांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT