colors marathi GST express new show esakal news
colors marathi GST express new show esakal news 
मनोरंजन

छोट्या पडद्यावर धावणार आता विनोदाची 'जीएसटी एक्स्प्रेस'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : “GST” नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काही लोकांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण या GST मुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. GST ने सर्वांनाच हैराण केलं, हे काय कमी होतं कि आता कलर्स मराठीवर देखील GST लागू होतो आहे. कारण, आता प्रेक्षकांसाठी एक अशी एक्सप्रेस सज्ज आहे ज्यामध्ये स्वार झाल्यावर तुम्ही तुमची दु:ख विसरणार हे नक्की. कलर्स मराठी सज्ज आहे GST एक्स्प्रेस घेऊन. GST म्हणजे गायब सगळं टेंशन ही एक्सप्रेस प्रेक्षकांना टेंशन देणार नाही तर त्यांचं टेशन क्षणात दूर करणार आहे. या एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर प्रेक्षकांना चिंतांचा विसर पडणार आहे हे नक्की कारण ही एक्सप्रेस सगळ्यांना १००% हसण्याची हमी देणार आहे. तेंव्हा टेंशन विसरण्यासाठी बघायला विसरू नका कलर्स मराठीवर एक धम्माल विनोदी कार्यक्रम “कॉमेडीची GST एक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा.

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्स याने केली आहे, तसेच ज्ञानेश भालेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.
 
दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देण्याचा हेतू लक्षात घेऊन कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या विनोदविरांना बघायला मिळणार आहे. त्यांची अतरंगी, खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोद यामुळे प्रेक्षकांना १०० % हसण्याची हमी मिळणार आहे. आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती शारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे विनोवीर सज्ज आहेत प्रेक्षकांना हसविण्यासाठी आपली एक्सप्रेस घेऊन. या विनोदविरांबरोबर असणार आहेत प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक जे या धम्माल कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. या कार्यक्रमामध्ये काय वेगळेपण असणार आहे? हे विनोद सम्राट नक्की काय करणार आहेत ? कशी धम्माल करणार आहेत ? हे बघयला या आणि टेंशन फ्री व्हा !
 
कार्यक्रमाविषयी बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले, “ पहिले गायक मग संगीत दिग्दर्शक त्यानंतर निर्माता, सूत्रसंचालक, परीक्षक अश्या अनेक रोलमध्ये मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना भेटलो हे प्रेक्षकचं माझे गुरु आहेत आणि मार्गदर्शक देखील ज्यांनी नेहेमीच मला मार्ग दाखवला आणि मला प्रोत्साहन दिले. आज त्यांच्याच शुभेच्छा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन मी माझा नवीन प्रवास सुरु करतो आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. प्रेक्षकांना हसवणे खूप कठीण असते पण त्याला दाद देणे अगदीच सोपे असते आणि मी यावेळेस हाच सोपा मार्ग स्वीकारला आहे. कलर्स मराठीवरील ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये मी मार्गदर्शकाची भूमिका वठवणार नसून प्रथम प्रेक्षक असणार आहे. मी कार्यक्रमामध्ये असलेल्या विनोदवीरांबरोबर हसणार आहे, गाणार आहे, त्यांच्या उत्तम विनोदांना दाद देखील देणार आहे. या कलाकारांना मी प्रोत्साहन देणार आहे ज्यामुळे ते सामान्य माणसाला निखळ हसण्याचा आनंद देऊ शकतील, ज्यांच्या विनोदाने त्यांना त्यांच्या दु:खाचा विसर पडेल आणि नेहेमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून त्यांना काही मोलाचे क्षण आमचे विनोदवीर या कार्यक्रमातून देतील. कलर्स मराठीचे खूप आभार कि, त्यांनी मला कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली. मी या कार्यक्रमाबाबत खूपच उत्सुक आहे. आमचा हा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.
 
संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे खुमासदार विनोदांची मेजवानी आणि हसण्याची १००% हमी फक्त कलर्स मराठीवर. तेंव्हा बघायला विसरू नका “कॉमेडीची GST एक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT