Conman Sukesh Chandrasekhar doing fast in navratri Pens Navratri Wish for Jacqueline from Jail  SAKAL
मनोरंजन

Sukesh - Jacqueline:"फक्त तुझ्यासाठी नवरात्रीत मी उपवास ठेवणार", सुकेशचं जॅकलीनसाठी पुन्हा एकदा प्रेमपत्र

सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडीजसाठी नवरात्रीनिमित्त खास प्रेमपत्र लिहीलंय

Devendra Jadhav

जॅकलीन फर्नांडीझचा तथाकथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. २०० करोडच्या मनी लॉंड्रींग प्रकरणात सुकेशने मनी लॉंड्रींग प्रकरणात सध्या जेलमध्ये आहे.

सुकेशने अनेकदा जॅकलीनसाठी प्रेमपत्र लिहून त्याच्या भावना व्यक्त केल्यात. अशातच सुकेशने जॅकलीनसाठी पुन्हा एक पत्र लिहीलंय. यावेळी सुकेश जॅकलीनसाठी नवरात्रीचा खास उपवास ठेवणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

सुकेशने तुरुंगातून जॅकलीनसाठी आपल्या पत्रात लिहिले," बेबी, उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. तुझ्या आनंदासाठी आणि आजूबाजूची नकारात्मकता दूर करण्यासाठी मी आयुष्यात प्रथमच संपूर्ण नवरात्रीचे ९ दिवस व्रत ठेवणार आहे. देवीच्या शक्तीने सर्व काही ठीक होईल आणि शेवटी सत्याचाच विजय होईल. काहीही झाले तरी आपण लवकरच एकत्र राहू.

सुकेशच्या पत्रातील पुढील मजकूर असा आहे की, "नवरात्रीच्या नवव्या दिवशी वैष्णोदेवी मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात दोघांसाठी खास पूजा आयोजित करणार आहे. बेबी, माझ्यावर विश्वास ठेव, जे आजपर्यंत आपल्यावर हसले, आम्हाला कमी लेखले आणि तुमच्या आणि माझ्याबद्दल टीका केली, ते लवकरच खोटं पडतील. आणि हो हे नक्की घडणार आहे.

सत्याची विजय होण्याची वेळ जवळ आली आहे. आमच्यावरील एकही आरोप खरा ठरणार नाही. बेबी, विजय आमचाच असेल. हे आता जगाला दिसेल, आमच्यावरील एकही आरोप खरा ठरणार नाही, सर्व काही निष्फळ ठरेल.

काही दिवसांपुर्वी सुकेशने प्रसिद्ध गायक-संगीतकार मिका सिंगला जॅकलिनच्या इंस्टाग्राम फोटोवर कमेंट केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

मिकाने जॅकलीनच्या एका फोटोवर सुकेशची खिल्ली उडवली. त्यामुळे सुकेशने थेट गायक मिका सिंगला जॅकलीनच्या फोटोखाली कमेंट केल्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT