'इंडियन आयडॉल' हा रिअॅलिटी शो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या शोचा बारावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यातील एका स्पर्धकामुळे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. सायली कांबळेला कार्यक्रमात गरीब दाखवून प्रेक्षकांची फसवणूक केल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून होत आहे. सायलीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी 'इंडियन आयडॉल' या शोवर संताप व्यक्त केला आहे. गरीब नसलेल्या स्पर्धकालाही गरीब दाखवलं तर कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
सायलीच्या आयुष्याबद्दलचा एक व्हिडीओ 'इंडियन आयडॉल'मध्ये दाखवण्यात आला. यामध्ये ती अत्यंत गरीब घरातून आली असून तिचे वडील रुग्णवाहिकाचालक असल्याचं दाखविण्यात आलं आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत सायलीने तिच्या घरी टीव्हीदेखील नसल्याचं सांगितलं होतं. या सर्व परिस्थितीच्या उलट तिचा दुसरा व्हिडीओ युट्यूबवर पाहायला मिळतोय. या व्हिडीओत सायली ही प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत मंचावर गाणी गाताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून सायलीच्या गरीब परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
'इंडियन आयडॉलमध्ये असं सांगितलं की सायलीच्या कुटुंबीयांना टीव्हीसुद्धा विकत घेणं परवडू शकत नाही. आता मी हे काय पाहतोय? इंडियन आयडॉल हा फक्त ड्रामा शो आहे', अशी कमेंट एकाने केली. तर इंडियन आयडॉलच्या विश्वासार्हतेवर अनेकांनी सवाल केला आहे. याआधीही आणखी एका स्पर्धकासोबत असाच प्रसंग घडला होता. स्पर्धक सवाई भटलाही कार्यक्रमात गरीब दाखवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्याची परिस्थिती बेताची नव्हती असं लक्षात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.