arun gawli 
मनोरंजन

आजोबा अरुण गवळी नातीच्या भेटीला; फोटो व्हायरल

'आयुष्यभराची आठवण आणि अनुभव'

स्वाती वेमूल

अभिनेता अक्षय वाघमारे Akshay Waghamare आणि योगिता गवळी Yogita Gawli यांच्या घरा चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. गेल्या वर्षी ८ मे रोजी लॉकडाउनमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. योगताने ७ मे २०२१ रोजी मुलीला जन्म दिला. योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची Arun Gawli (डॅडी) मुलगी आहे. आता आजोबा अरुण गवळींनी नुकतीच नातीची भेट घेतली आहे. अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर आजोबा-नातीच्या भेटीचा हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. (daddy aka arun gawli meets his granddaughter photo viral)

'जेव्हा रहस्य गुंतलेली असतात तेव्हाच आकर्षणे तीव्र असतात', असं कॅप्शन अक्षयने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये अरुण गवळी नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे. नातीला भेटण्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. 'आयुष्यभराची आठवण आणि अनुभव', अशी कमेंट योगिताने या फोटोवर केली आहे.

अक्षय आणि योगिताने त्यांच्या मुलीचं नाव 'अर्णा' असं ठेवलं आहे. १४ जून रोजी अक्षयने मुलीचं नाव जाहीर केलं. 'मला इतका आनंद झाला आहे की मी तो शब्दांत मांडू शकत नाही. आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच ही गोड बातमी मिळाली. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला', अशा शब्दांत अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. दगडी चाळीतच योगिता आणि अक्षयचं लग्न पार पडलं होतं. २०१९ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

SCROLL FOR NEXT