मनोरंजन

दामोदर मौजो यंदाच्या 'ज्ञानपीठ पुरस्काराचे' मानकरी

सकाळ डिजिटल टीम

दामोदर मौजो हे गोव्याचे कादंबरीकार, स्तंभलेखक, पटकथा लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांना 1983 मध्ये 'कार्मेलिन' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कारने सन्मानित केले होते. ही कादंबरी अनेक भाषांमध्ये अनुवादित केली आहे. त्यांच्या अनेक लघु कथा भाषांतरीत करून राष्ट्रीय पातळीवरील काव्यसंग्रह आणि मासिकांमध्ये आल्या आहेत. इंग्रजी भाषा सोडली तर, काही कथा या पोर्तुगीज आणि फ्रेंचमध्ये सुद्धा अनुवादित केल्या आहेत.

दामोदर मौजोंना आज पर्यंत क्रिएटिव्ह फिक्शनसाठी कथा पुरस्कार, गोवा कला अकादमी पुरस्कार, गोवा राज्य चित्रपट महोत्सव 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार, आदी पुरस्कार मिळाले आहेत. मौजो यांना 2011-2012 साठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ फेलोशिप देखील प्रदान करण्यात आली.

मौजो एक कार्यकर्ते देखील आहेत. 2015 मध्ये प्रो.एम एम कलबुर्गी यांच्या हत्येनंतर, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या 'संकुचित' विरोधात ते बोलले. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासादरम्यान कर्नाटक पोलिसांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आढळून आले. यापूर्वी 2008 मध्ये, रवींद्र केळेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले कोकणी लेखक ठरले. 2019 चे ज्ञानपीठ मल्याळम कवी अक्कितम यांना प्रदान करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT