Gautami Patil sakal
मनोरंजन

Gautami Patil: गौतमी ही तू आहेस? आईसोबतचा क्यूट फोटो व्हायरल

गौतमी पाटीलच्या आईचा फोटो आला समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेले काही दिवस ती तिच्या आई वाडिलांमुळे, तिच्या आडनावावरून चर्चेत आली. तर आता चर्चेत आली त्याच कारण काहीसं वेगळं आहे. गौतमीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरती एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो गौतमीच्या बालपणीचा आहे. (Marathi Tajya Batmya)

सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पहिल्यांदाच गौतमीची आई पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कमेंटबॉक्समध्ये तिच्या चाहत्यांनी गौतमी आपल्या आईची हुबेहूब कॉपी दिसत असल्याचे देखील म्हटले आहे. (Latest Marathi News)

गौतमी पाटीलने @Official_Gautami941 या अकाउंटवरून तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे गौतमीचं अधिकृत अकाउंट असल्याचं बोललं जात आहे.गौतमीच्या या अकाउंटला तब्ब्ल ८ लाखाहून अधिक फॉलोवर्ससह आहेत. या फोटोला “माझं जग, मी आणि माझी आई” असं कॅप्शन तिने दिलं आहे.(Marathi Tajya Batmya)

आडनावावरून आली होती चर्चेत

मराठा समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये असे सांगत इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली होती. त्यावर मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच असे गौतमीने ठामपणे म्हटले आहे.(Latest Marathi News)

गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असे असून ते सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे या गावी राहतात. हेच गौतमीचे मूळ गाव आहे. तर गौतमीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गौतमीच्या जन्माआधीच आई व वडील वेगळे झाले होते, आठवीत असताना गौतमीने पहिल्यांदा वडिलांना पहिले होते असंही तिने सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT