Dasara Movie Sakal
मनोरंजन

Dasara OTT Release: 'दसरा'ची OTT रिलीज डेट आऊट, जाणून घ्या नानीचा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

नानीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'दसरा' हा चित्रपट आता OTT वरही प्रसारित होणार आहे.

Aishwarya Musale

तेलुगू स्टार नानीचा 'दसरा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होती आणि त्यानंतर चित्रपटाने चांगली कमाई केली. नानीच्या चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दुसरीकडे, ज्यांना नानीचे चित्रपट आवडतात त्यांना दसरा थिएटरमध्ये पाहता आला नाही, तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OTT वर चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची अधिकृत तारीख आता आली आहे.

नानी आणि कीर्ती सुरेश यांचा 'दसरा' हा चित्रपट २७ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. स्ट्रीमिंग सेवेने आपल्या सोशल मीडिया हँडलवरही याबाबत माहिती दिली आहे.

'दसरा'ची पोस्ट शेअर करत नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर लिहिले, "फटाके फोडण्याची वेळ आली आहे, कारण या वर्षी दसरा लवकर येत आहे! 'दसरा' नेटफ्लिक्सवर २७ एप्रिलला येत आहे."

'दसरा' हा 30 मार्च रोजी तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'दसरा'मध्ये नानी, कीर्ती सुरेश यांच्यासोबत दीक्षित शेट्टीनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

त्याचवेळी, 'दसरा'ची ओटीटी रिलीज डेट कळताच चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे वर्णन नानीचा आजपर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट म्हणूनही करण्यात आला आहे. या चित्रपटातील नानीचा दमदार अभिनय खूप आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT