

LPL 2026 controversy
ESakal
लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामापूर्वी श्रीलंका क्रिकेटने खेळाडू निवडीचे नियम जारी केले आहेत. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आता खेळाडूंची श्रेणी निश्चित करण्यासाठी केवळ कामगिरी आणि अनुभवच नव्हे, तर सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. या नियमाने क्रिकेट विश्वाला धक्का बसला असून सर्वत्र गदारोळ माजला आहे. ही लीग १० जुलै २०२६ रोजी सुरू होणार आहे.