Dipika-and-Alia
Dipika-and-Alia 
मनोरंजन

आधी लग्न कोण करणार, दीपिका की आलिया...

सकाळवृत्तसेवा

दीपिका पदुकोन आणि आलिया भट लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या दोघींना एकत्र शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. रणबीर कपूर हेही त्यामागचे एक कारण आहे. दीपिका आणि रणबीर एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु नंतर ते वेगळे झाले.

आता रणबीर आणि आलिया भट एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे या दोघांचे एकत्र येणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. करणने त्याच्या सोशल अकाउंटवर आलिया आणि दीपिकासोबतच्या एपिसोडचा ट्रेलर शेअर केला आहे.

यात करण या दोघींना काही मजेशीर प्रश्‍न विचारत असून, त्याला तेवढीच मजेदार उत्तरे या दोघी देताना दिसत आहेत. तुमच्या दोघींपैकी आधी लग्न कोण करणार, या प्रश्‍नावर दीपिका आणि आलिया एकमेकींकडे बोट दाखवून हसताना दिसतात. यावर आलिया दीपिकाला तू खोट बोलत असल्याचे सांगते. या वर्षाच्या अखेरीस दीपिका पदुकोण आणि रणबीरसिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT