Dhaakad Actress Kangana Ranaut comment
Dhaakad Actress Kangana Ranaut comment  esakal
मनोरंजन

'तीनपैकी एकच खान आपला चांगला मित्र बाकीचे...' कंगनानं केलं त्याचं कौतुक

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असते. कंगनाच्या वक्तव्यांनी तिला (Bollywood Actress) वादाच्या भोवऱ्यात अडकवले आहे. मात्र तिला त्याचे काहीही नाही. तिनं आतापर्यत बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. सध्या (Actress Kangana Ranaut) प्रख्यात गीतकार जावेद अख्तर आणि कंगना यांच्यातील वाद हा कोर्टापर्यत केला आहे. ते प्रकरण अजुन न्यायप्रविष्ट आहे. आता (Viral News) कंगना तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिनं बॉलीवूडमधल्या एका खान अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. यापूर्वी कंगनानं बॉलीवूडमधल्या तीनही खान अभिनेत्यांच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती.

कंगना सध्या तिच्या धाकड नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या लॉ़क अप या मालिकेचा पहिला सीझनचा ग्रँड सोहळा पार पडला. या रियॅलिटी शो ला कंगनाच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मुनव्वर फारुख हा पहिल्या सीझनचा विजेता ठरला. त्यानंतर कंगनानं तिच्या धाकड चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल केला होता. त्याच नेटकऱ्यांनी स्वागत केलं होतं. त्यातील कंगनाच्या हटक्या लुकचं कित्येकांनी कौतुकही केलं. कंगना आणि बॉलीवूडमधील खान मंडळीचं नातं कसं आहे हे अनेकांना माहिती आहे. तिनं वेगवेगळ्या मुलाखतीतून त्यांच्यावर केलेली टीकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशावेळी कंगनानं एका खान अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांना तो खान अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे. कारण कंगना नेहमीच तिच्या पोस्टमधून खान कलाकारांवर तोफ डागत आली आहे. कंगनानं एका मुलाखतीतून सलमान खान हा आपला चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरी ईद पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला कंगना हजर होती. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंवरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. इतरवेळी खान अभिनेत्यांना नावं ठेवते आणि आता त्यांच्याच ईद पार्टीमध्ये सहभागी होते. अशी टीका कंगनावर झाली होती. सलमान खान हा माझा चांगला मित्र आहे. आणि त्यानं मला पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून मी गेले. असं उत्तर कंगनान दिलं होतं. सलमाननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कंगनाच्या धाकड गर्ल ट्रेलरचं कौतुक करत तिच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT