
Kangana Video: कंगना भर पार्टीत सारखं कुणाला किस करतेय, तो आहे कोण?
Kangana Ranaut Viral Video: कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या (Tv entertainment News) कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना (Kangana Ranaut) ही तिच्या लॉक अप या रियॅलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आली होती. तिच्या या पहिल्या रियॅलिटी शो ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Viral Video) हा शो सुरु होण्यापूर्वी राखी सावंतनं कंगनाला चँलेंज दिलं होतं. तिनं हा शो कंगनाला शंभर दिवस चालवून दाखवावा. असं म्हटलं होतं. कंगनानं प्रेक्षकांच्या प्रतिसादावर लॉक अपच्या पहिल्या सीझनला यशस्वी करुन दाखवलं (Poonam Pandey) आहे. यासगळ्यात कंगनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती एका व्यक्तीला सतत किस करताना दिसत आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावरील त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला तो व्यक्ती कोण आहे असा प्रश्नही विचारला आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रेटींसोबत पार्टी करतानाचा कंगनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन ती चर्चेत आली आहे. कंगना सध्या तिच्या धाकड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये देखील ती धाकडच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्याच्या टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून आता चित्रपटाची उत्सुकता आहे. कंगनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती एका व्यक्तीला सातत्यानं किस करताना दिसत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, तो व्यक्ती आहे तरी कोण...ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून लॉक अपमधील स्पर्धक शिवम सिंह आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतो आहे.

Bollywood Actress Kangana Ranaut Lock Upp
हेही वाचा: Kangana: अभिनेत्यांचे चेहरे उकडलेल्या अंड्यांसारखे! बॉलीवूडचे टोचले कान
कंगनानं लॉक अपच्या पहिल्या सीझनच्या ग्रँड सक्सेसबद्दल मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्य पार्टीमध्ये लॉक अपमधील स्पर्धक सहभागी झाले होते. टीव्ही मनोरंजन क्षेत्राची क्वीन एकता कपूरनं या पार्टीचं आयोजन केल्याची चर्चा आहे. लॉक अपमध्ये सतत भांडणारे स्पर्धक याप्रसंगी त्या पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. कंगनाही जाम खुश आहे. पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासगळ्यात नेटकऱ्यांना कंगना आणि शिवमचा व्हिडिओ सर्वाधिक आवडला आहे.
हेही वाचा: Kangana Vs Alia: मणिकर्णिका- गंगुबाईची 'नळावरची भांडणं'
Web Title: Bollywood Actress Kangana Ranaut Lock Upp Grand Party Video Kissing Shivam Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..