Dharmaveer 2 Chief Minister eknath Shinde tells the interesting story of Prasad Oak
Dharmaveer 2 Chief Minister eknath Shinde tells the interesting story of Prasad Oak Esakal
मनोरंजन

Dharmaveer 2: तो अंधारामध्ये चालत आला अन्... मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला प्रसाद ओकचा रंजक किस्सा

Devendra Jadhav

धर्मवीर २ सिनेमाच्या शुटींगचा मुहूर्त आज संपन्ना झाला. यावेळी मुहूर्ताला आनंद दिघेंची भूमिका साकारणारा प्रसाद ओक, सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, एकनाथ शिंदेंची भूमिका करणारा क्षितीज दाते असे सर्वजण उपस्थित होते.

या मुहूर्त सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक बद्दल रंजक किस्सा सांगितला आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं प्रसादचं कौतुक

प्रसाद ओकने धर्मवीर २ मध्ये आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. त्याचं कौतुक करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, "धर्मवीर सिनेमाला १७ - १८ पारितोषिक मिळाली. एकदम रेकॉर्डब्रेक. अभिनयासाठी मिळालेले पुरस्कार वेगळे.

पुढे प्रसादचं कौतुक करताना शिंदे म्हणाले, "प्रसादला मानलं पाहिजे. प्रवीण बरोबर शोधलं तू त्याला. दिघे साहेबांची भूमिका साकारतोय. एकदा प्रसाद अंधारामध्ये चालत आला आणि मला दिघेसाहेबांचा भास झाला. अभिनय करताना जीव ओतावा लागतो. आनंद दिघे कसे जगले , ते कसे बोलायचे, कसे वागायचे, त्यांची स्टाईल अशा सर्व गोष्टी त्याने आत्मसात केल्या. दिघेसाहेबांच्या संपर्कात असलेल्या लोकांशी तो बोलला आणि त्याने भूमिका साकारलीय."

याशिवाय पहिल्या भागात एकनाथ शिंदें नगरविकास मंत्री म्हणून दिसले होते. दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून क्षितीज दाते भूमिका साकारणार आहे.

या तारखेपासुन होणार धर्मवीर २ ला सुरुवात

येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे धर्मवीर २ च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे "धर्मवीर २" चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे निभावणार आहेत.

अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

एकंदरीतच "धर्मवीर" चित्रपटात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता "धर्मवीर २"मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.

"धर्मवीर २" चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT