dilip joshi from taarak mehta ka ooltah chashmah taking break from acting  SAKAL
मनोरंजन

Taarak Mehta News: सर्वांना धक्का! जेठालाल उर्फ अभिनेते दिलीप जोशी मालिकेतून घेणार ब्रेक, स्वतःच केला खुलासा

दिलीप जोशी तारक मेहता का उल्टा चष्मा शोमधून ब्रेक घेणार आहेत, वाचा सविस्तर

Devendra Jadhav

Dilip Joshi Break form Taarak Mehta News: गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा शो प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. TRP मध्ये हा शो टॉपला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे फॅन आहेत.

अशातच तारक मेहता का उल्टा चष्मा शोच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तारक मेहता मधील जेठालाल म्हणजेच सर्वांचे लाडके अभिनेते दिलीप जोशी शोमधून ब्रेक घेणार आहेत. दिलीप जोशींनी स्वतः व्हिडीओ शेअर करत हा खुलासा केलाय.

(dilip joshi from taarak mehta ka ooltah chashmah taking break from acting)

या कारणामुळे तारक मेहता का उल्टा चष्मामधून जेठालालने घेतला ब्रेक!

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी आपल्या कुटुंबासह टांझानियाला धार्मिक सहलीला जाणार आहे. या गोष्टीमुळे दिलीप यांनी तारक मेहता का उल्टा शोमधून काही दिवसांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलीप यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या धार्मिक प्रवासाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जेठालाल काही दिवस तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दिसणार नाही.

सहकुटुंब सहपरिवार दिलीप जोशी जाणार अबू धाबीला

तारक मेहता का उल्टा चष्माच्या व्यस्त शेड्युलमध्ये कलाकारांना फारसा ब्रेक मिळत नाही. आणि यावेळी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी त्यांच्या शेड्युलमधून या सहलीनिमित्ताने छोटा ब्रेक घेतला आहे.

दिलीप यांच्या व्हिडीओ पोस्टमध्ये त्यांनी धार्मिक प्रवासाचा उल्लेख केला आहे. व्हिडीओमध्ये दिलीपने असेही सांगितले की, ते एका धार्मिक प्रसंगी अबुधाबीलाही भेट देणार आहेत. जेठालालने शोमधून ब्रेक घेतल्याच्या बातमीने त्याच्या चाहत्यांची मात्र घोर निराशा झाली आहे.

सध्या तारक मेहता.. मध्ये कोणता ट्रॅक सुरु आहे

तारक मेहता का उल्टा चष्माच्या सध्याच्या ट्रॅकबद्दल बोलताना, गोकुळधामच्या लोकांनी अखेर गणेश चतुर्थी साजरी केली आणि बाप्पाचे स्वागत केले. यावेळी जेठालालने आपण गणेशोत्सवात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. बाप्पाचे स्वागत करून पहिली आरती केल्यानंतर ते इंदूरला रवाना होतील. हे दृश्य जेठालाल शूटिंगमधून ब्रेक घेत असल्याने काही दिवसांसाठी शोमधून बाहेर जाण्याचे संकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT