Ashutosh Gowariker with Narendra Modi Twitter
मनोरंजन

नरेंद्र मोदींनी का धरला दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरांचा हात?

दिग्दर्शकानं ट्वीटरवरुन सांगितलं यामागचं कारण

प्रणाली मोरे

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे,त्यामुळे पुन्हा अनेक देशांनी,देशांमधील राज्यांनी, शहरांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. याच नियमांचा फटका मनोरंजनक्षेत्रातालाही बसला आहे. सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शन करायची परवानगी जरी दिली असली तरी ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधानं निर्मात्याला काहीच फायदा होत नाही हे दिसून येतंय. पण इथे सिनेमा पहायला भीतीपोटी प्रेक्षकवर्गही येताना दिसत नाही ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. राजधानी दिल्लीत तर मल्टिप्लेक्स,सिंगल थिएटर्स बंदच करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी आपल्या सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर टाकलंय. कुणी सिनेमाचं शुटिंग पुढे ढकललंय. या सगळ्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्राच्या अर्थचक्रावर होतोय. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी पतंप्रधान नरेंद्र मोंदी यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरनं त्यांनी त्या भेटीचं कारण आणि पंतप्रधानांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

आशुतोष गोवारिकर(Ashutosh Gowariker)यांनी त्यांच्या ट्वीटरवरील पोस्टमध्ये नरेंद्र मोदींचं भरभरून कौतूक केलं आहे. त्यांनी लिहिलंय,''आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही पाहिलेलं स्वप्न,त्यादृष्टीने तुम्ही करत असलेले प्रयत्न,तुमचं व्हिजनं खूप मोलाचं आहे. तुम्ही तुमच्या विचारांच्या बाबतीत खूप ठाम आहात आणि प्रत्येक गोष्ट कशा पद्दतीनं करायची आहे यासंदर्भात तुमचे विचार खूप स्पष्ट आहेत. कुठेच कसला गोंधळ नाही. तुम्हाला भेटल्यानंतर या सर्वगोष्टी मला खूप छान समजल्या आणि मी तुमच्या विचारांनी प्रेरित झालो आहे''. अशा पद्धतीची ती एकंदरीत पोस्ट आहे. पण अशी अचानक आशुतोष गोवारिकर यांनी नरेंद मोदी यांची भेट घेतली यामुळे सिनेसृष्टीत मात्र चर्चेला उधाण आलंय. कोरोनाकोळात मनोरंजनसृष्टीसंदर्भात लादण्यात आलेल्या निर्बंधांबाबतीत चर्चा होती की कोरोनानंतर मनोरंजनक्षेत्राला आर्थिकदृष्टया पुन्हा सक्षम करण्यासाठी मदतीचा हात मागण्यासाठी ही भेट होती असे अनेक अंदाज लावले जात आहेत. काही का असेना फोटोत ज्यापद्दतीनं मोंदींनी गोवारिकरांचा हात पकडला आहे त्यावरुन तरी नक्कीच वाटतंय सिनेक्षेत्राला मोदींचा आधार नक्कीच मिळणार. 2019 साली आशुतोष गोवारिकर यांचा ऐतिहासिक 'पानिपत' सिनेमा आपल्या भेटीस आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT