Mogara Phulaala 
मनोरंजन

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नील जोशीचे काका...

सकाळवृत्तसेवा

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. हे सुनीलच्या खूप जवळचे आणि मैत्रीपूर्ण असे पात्र आहे. दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटामध्ये सुद्धा एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे.

‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होण कठीण’ या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचे काका झालेले चंद्रकांत कुलकर्णी हे स्कूटरवर स्वार झाले आहेत. त्यांची केमिस्ट्री त्यातून व्यक्त होते. त्यांच्यातील नात्याचा आणि त्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी 1995 साली आलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ या चित्रपटामध्ये अभिनय केला होता. त्याचबरोबर 2012 साली प्रदर्शित झालेल्या‘पिपाणी’ या चित्रपटात चंद्रकांत कुलकर्णी यांना शेवटचा अभिनय करताना पहायला मिळाले होते. त्यानंतर आता ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात अभिनय करणार आहेत.

आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, ‘सिनेमा आणि नाट्यसृष्टीत माझी ओळख एक दिग्दर्शक म्हणूनच आहे. ज्यावेळी कोणताही दिग्दर्शक किंवा लेखक एखादा मराठी चित्रपट करत असतो, आणि त्याला एखाद्या भूमिकेविषयी असा ठाम विश्वास वाटतो की ही भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णीच करू शकतात त्याचवेळी मी ती भूमिका करतो. तसच काहीसं ‘मोगरा फुलला’ या चित्रपटच्या बाबतीत झालं आहे. सिनेमाचे लेखक सचिन मोटे यांना असा ठाम विश्वास होता की ही नाट्य दिग्दर्शकाची भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णी साकारू शकतात, म्हणूनच मी हा चित्रपट केला’.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सई देवधर, नीना कुळकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT