Girish Malilk news
Girish Malilk news esakal
मनोरंजन

'दारु पिऊ नको', सांगितलं: दिग्दर्शकाच्या मुलाची आत्महत्या

सकाळ ऑनलाईन टीम

Girish Malik Son Manan: कुणाला कशाचा राग येईल आणि त्या रागातून काय घड़ेल याचा आता भरवसा राहिलेला नाही. मुलगा दारु पितो म्हणून दिग्दर्शक (Bollywood news) वडिलांनी मुलाला समजावून सांगितलं. मात्र त्याचा मुलाला राग आल्यानं त्यानं रागाच्या भरात उचलेलं पाऊल त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक गिरिश मलिक यांच्या 17 वर्षीय मुलानं मनननं पाचव्या (Bollywood Director Girish Malik) मजल्यावरुन उडी मारुन स्वताला संपवलं आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसलली आहे. मननला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. होळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संजय दत्तला (Sanjay Dutt) घेऊन तोरबाज या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या गिरिश मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मलिक यांच्या मुलाच्या आत्महत्येचे वृत्त कळताच अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथे असलेल्या ओबेरॉय स्प्रिंगमध्ये हा प्रकार घडला. मनन हा त्याच्या मित्रांसमवेत होळी खेळण्यासाठी गेला होता. दुपारी तो घरी आला. त्यावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं. आणि तो घरी आल्यानंतर देखील दारु पित होता. तेव्हा त्याला वडिल मलिक यांनी दारु पिऊ नको असं सांगितलं. मात्र त्यावर त्यानं कोणतीही प्रतिक्रिया न देता पिणं सुरुचं ठेवलं. तेव्हा मलिक आणि मनन यांच्यात वादही झाला. रागाच्या भरात बाल्कनीतून खाली उडी मारली. त्यात त्याचा मृत्यु झाला.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तनं यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मी मननला दोनवेळा भेटलो होतो. तो एक चांगला मुलगा होता. त्याच्या जाण्यानं वाईट वाटलं. मी मलिक यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो. सोशल मीडियावरुन देखील मलिक यांना नेटकऱ्यांनी आधार दिला आहे. मननला श्रद्धांजली वाहिली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकारी बनसोडे यांनी सांगितलं की, मननंची आईसोबतही या कारणावरुन भांडणं झाली होती. तो जेव्हा दारु प्यायचा तेव्हा त्याला त्यावरुन कुणी सांगितलं तर त्यांच्यावर तो चिडायचा. त्याच्या स्वतावर ताबा राहत नसे. त्याची चिडचिड होत असे. त्यादिवशी देखील त्याला त्याच्या वडिलांनी दारु पिऊ नये असे सांगितले. त्याचा त्याला राग आला. वडिल त्यांच्या खोलीत निघुन गेल्यावर त्यानं बाल्कनीतून उडी मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT