Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारची वेगळी ओळख आहे.
Bachchan Pandey
Bachchan Pandeyesakal

Bollywood Movies: बॉलीवूडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारची वेगळी ओळख आहे. तो गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती घेऊन (Akshay Kumar) प्रेक्षकांसमोर येतो आहे. त्यात त्याला बऱ्यापैकी यशही मिळाले आहे. मात्र (Entertainment News) त्यात त्याला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा ते कमीच होते. त्याच्या चित्रपटाची नेहमीच काँट्राव्हर्सी देखील होत असते. ती त्याच्या लक्ष्मी (Bollywood News) बॉम्बच्या वेळेस झाली. बेल बॉटमच्या वेळीही होती. आणि आता बच्चन पांडेच्या बाबतही तसेच होते आहे. चित्रपटात काही दम नसेल तर बऱ्याचदा त्याच्या इतर बाबींवरुन चर्चेला सुरुवात होते. वाद घडवून आणणारेही सराईत असल्यानं त्यांना फारसं काही सांगावं लागत नाही. कोर्टाकडे अशा जनहित याचिकांचा खच पडलेला असतो. मात्र त्यात काही तथ्य़ नसल्यानं कोर्टही अशा याचिकाकर्त्यांची कानउघाडणी करताना दिसून आले आहे. बच्चन पांडे आज प्रदर्शित झाला. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. कारण तो अक्षयचा चित्रपट होता. पण सध्या अक्षय वेगळ्याच धुंदीत असल्याचे बच्चन पांडेत (Bachchan Pandey) दिसले आहे. गँगस्टरच्या भूमिकेनं त्याला एवढं भुलावलं आहे की, आपल्याला नक्की प्रेक्षकांना काय सांगायचे आहे हेच तो विसरुन गेला आहे.

अक्षय सोबत या चित्रपटामध्ये क्रिती सेनन, जॅकलीन फर्नांडिझ, अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बच्चन पांडे हा 2014 साली आलेल्या तमिळच्या जिगरहाट्टा नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. आपल्याकडे हल्ली टॉलीवूडच्या रिमेकला जास्त वाव दिला जात आहे. तिच कॉपी करुन प्रेक्षकांना टिपिकल मालमसाला देण्यात निर्मात्यांना, दिग्दर्शकांना धन्यता वाटत आहे. एका स्ट्रगलर फिल्ममेकरला सर्वात भयानक अशा गुंडावर बायोग्राफी तयार करायची आहे. त्यासाठी तिचा शोध सुरु आहे. आपण कुणावर बायोग्राफी तयार करु शकतो असा तिला प्रश्न पडलाय. शेवटी तिच्या डोक्यात बच्चन पांडेचे नाव येते. येथून पुढे चित्रपट सुरु होतो. त्यापूर्वी बच्चन पांडे किती क्रुर, संतापी, रागीट आहे याच्या उदाहरणादाखल काही प्रसंग येतात. तो खरचं दिसतो तेवढा राक्षसी प्रवृत्तीचा आहे का, हे जाणून घेण्यासाठी काही वेळ त्याचा फ्लॅशबॅकही आपल्यासमोर येतो. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीच ठरवायचं की तो कसा आहे?

खरं सांगायचं तर ट्रेलरनं प्रेक्षकांना बच्चन पांडे थोडाफार वेगळा वाटला होता. मात्र प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यानंतर आपली बरीचशी निराशा होती. अक्षयपेक्षा त्याचा सहकलाकार अर्शद वारसीनं लक्षवेधी भूमिका केली आहे. क्रिती सेननला फारसा वाव नाही. अक्षयनं स्वताला जास्तीत जास्त क्रुर खलनायक आणि नायक असे दाखवण्याचा फारच ओढून ताणून प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही वेळेला तो प्रभावी वाटतो पण त्याचं प्रमाण फारच कमी आहे. एखाद दुसरा संवाद आपल्या लक्षात राहतो. नाहीतर बऱ्याचवेळा अक्षयचं ते विक्षिप्त हसणं, मध्येच गंभीर होवून काहीतरी विचित्रच कृती करणं हे पाहणं जीवावर आल्यासारखं होतं. एखाद्याच्या डोक्यात हातोडीनं वार करत राहणं, प्रेक्षकांनी त्याचा तो रक्ताळलेला हात पाहणं थोडक्यात एवढी हिंसा दाखवणाऱ्या दिग्दर्शकाला बच्चन पांडेतून त्याच्या हिंसकतेचे समर्थन करायचे आहे की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

Bachchan Pandey
Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

बच्चन पांडेनं त्याच्या गर्लफ्रेंडचा खून केला आहे. त्यामुळे जेव्हा मायरा (क्रिती सेनन) ही गोष्ट कळते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. या माणसावर आपण तर बायोपिक करण्याचा विचार करतो आहोत तो एवढी भयानक कसा असू शकतो असा प्रश्न तिला पडतो. यातुन पुढे पुन्हा वेगळी स्टोरी आपल्यासमोर येते. फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आतापर्यत अक्षयनं गब्बरमध्ये अशा प्रकारची भूमिका साकारली होती. मात्र रावठी राठोड किंवा सूर्यवंशीमध्ये अक्षयच्या भूमिकेनं चाहत्यांची दाद मिळवली होती. तोच अक्षय बच्चन पांडे कमालीचा ओंगळवाणा वाटायला लागतो. त्याचा रागही येतो. कारण आपल्यासमोर काय चाललं आहे हेच कळत नाही. ज्यांना मारधाड, आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये रस आहे त्यांच्यासाठी बच्चन पांडे ऑप्शन आहे. ज्यांना रक्तपात पाहायला आवडतो त्यांनी जरुर बच्चन पांडेच्या वाट्याला जावं. पण खास बच्चन पांडे पाहायचा असा विचार करुन अक्षयचा वेगळा परफॉर्मन्स पाहायला जाल तर निराशा झाल्याशिवाय राहणार नाही.

बच्चन पांडे

दिग्दर्शक - फरहाद सामजी

कलाकार - अक्षय कुमार, क्रिती सेनन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिझ

स्टार - **

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com