director kedar shinde birthday post for wife bela shinde
director kedar shinde birthday post for wife bela shinde  SAKAL
मनोरंजन

Kedar Shinde: "५१ वर्षे होतायत पण...", पत्नीच्या वाढदिवसाला केदार शिंदे मनातलं बोलले

Devendra Jadhav

Kedar Shinde Birthday Post for wife Bela: अभिनेते - निर्माते- दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. केदार यांनी आजवर अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करुन मराठी प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं.

केदार यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांची पत्नी बेला शिंदे यांची खंबीर साथ दिली. आज बेला यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने केदार यांनी बेला यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.

केदार यांनी बेलासोबतचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, हा फोटो exactly उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे ऊभी होतीस म्हणून मी काहीतरी करू शकलो. तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा. चांगल्या वाईट दिवसात, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्या कला आयुष्यातले चढ उतार हे तू जास्तच भोगलेस.

केदार पुढे लिहितात, "५१ वर्षे होतायत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. खुप काही केलस, करतेयस, करशीलच याची खात्री आहे. वाढदिवस शुभेच्छा बेला शिंदे.. स्वामी कृपेने उत्तम होवो."

केदार शिंदेंनी २०२३ मध्ये विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' अशा सिनेमांच्या माध्यमातून केदार शिंदेंनी २०२३ मध्ये यशस्वी कामगिरी केली. आता २०२४ मध्ये केदार कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT