मनोरंजन

१८ वर्षांच्या संसारानंतर रजनीकांत यांच्या मुलीचा धनुषशी घटस्फोट

धनुषने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

दत्ता लवांडे

दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) याने पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. १८ वर्षांच्या संसारानंतर या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. (Divorced Between Dhanush And Aishwarya Rajnikant)

ऐश्वर्या ही प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची मुलगी असून तीचे आणि धनुषचे लग्न १८ नोव्हेंबर २००४ रोजी झाले होते. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. ऐश्वर्या ही सिनेमात दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका म्हणूनसुद्धा काम करते. तसेच धनुष हा तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. १८ वर्षांच्या संसारानंतर या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषने आपल्या ट्विटरवरुन ट्विट करुन ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची माहीती दिली.

धनुषची पोस्ट -

''मैत्री, जोडीदार, एकमेकांचे हितचिंतक आणि पालक म्हणून १८ वर्षे पूर्ण केली. अनेक चढउतारांच्या या प्रवासात आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथून आम्हाला वेगवेगळे मार्ग निवडायचे आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून एकमेकांना समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. आमच्या या निर्णयाचा सन्मान करा आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक तेवढा खासगी वेळ द्या,'' अशी पोस्ट धनुषने लिहिली आहे.

ऐश्वर्यानेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली

'कॅप्शनची गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची आणि समजूतदारपणाची गरज आहे,' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील हा आणखी एक धक्कादायक घटस्फोट आहे. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी घटस्फोट जाहीर केला होता.

धनुष नुकताच आनंद एल राय दिग्दर्शित ' अतरंगी रे ' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याने सारा अली खान आणि अक्षय कुमार सोबत भूमिका साकारली होती. धनुषचा ' सर ' हा तेलुगू चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक, डान्सर, पटकथा लेखक म्हणून त्याने विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याने आतापर्यंत ४६ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून ४ राष्ट्रीय पुरस्कारांवर त्याने आपलं नाव कोरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT